'सकाळ होळी बिट्स  2k21' सोबत करा सुरांची उधळण      

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंगाला एक विशेष महत्त्व आहे.  रंग म्हणजे आनंद, रंग म्हणजे प्रेम, रंग म्हणजे नुसती धमाल, रंग धर्म पाहत नाही की जात,  हिंदू असो व मुसलमान, शीख असो वा इसाई, रंग सर्वांसाठी सारखेच

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंगाला एक विशेष महत्त्व आहे.  रंग म्हणजे आनंद, रंग म्हणजे प्रेम, रंग म्हणजे नुसती धमाल, रंग धर्म पाहत नाही की जात,  हिंदू असो व मुसलमान, शीख असो वा इसाई, रंग सर्वांसाठी सारखेच. असाच रंगांचा सण म्हणजे होळी.  होळी म्हणजे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक. केवळ हिंदू धर्मातील लोकच नाही तर देशविदेशातील लोकही होळीचा सण साजरा करतात.  रंगांची उधळण करत हा सण साजरा केला जातो.  मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाने आपल्या आनंदांच्या सर्व रंगांवर पाणी  फेरले आहे.  देशातील सर्वच सण-उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर केंद्र सरकार आणि राज्यसरकारांनी बंदी घातली आहे.  (Sprinkle the melody with the Sakal Holi Beats 2k21 ') 

मात्र आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलो आहोत. होळीच्या निमित्त सकाळच्या वतीने सर्व वाचक आणि प्रेक्षकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगांची नसली तरी सुरेल गाण्यांची उधळण वाचकांवर केली जाणार आहे.  होळीनिमित्त  प्रेक्षकांसाठी 'सकाळ होळी बिट्स  2k21'चे आयोजन करण्यात आले आहे.  होळीच्या दिवशी म्हणजे 28 मार्च रोजी सकाळ'च्या वतीने सकाळफेसबुक पेजवर सकाळी 9 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. या कार्यक्रमाचा एक झक्कास ट्रीजरही आम्ही तुमच्यासाठी शेयर केलाय.  नव्या जुन्या गाण्यांचा बँड'चा तुमच्या नक्की पसंतीस पडेल. त्यामुळे सार्वजनिकरित्या होळी साजरी करून संकट ओढवून घेण्यापेक्षा घरीच बसून सुरेल गाण्यांची होळी साजरी करूया. 

होळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी

खरंतर रंग आणि संगीताला आपल्या भारतात एक विशेष स्थान  आहे. जिथे रंग तिथे संगीत ठरलेलेच असते. पण कोरोनाने आपल्या या रंगांचा पूर्णपणे बेरंग केलाय. लहान मोठ्यांपासून सर्वाना होळीला  रंगात रंगायचे असते.  पण सकाळने रंगांचा नाही  तर जबरदस्त गाण्यांची  उधळण केली आहे. इथे पिचकारी आणि रंगाचे हात नसून वेगवेगळ्या वाद्यांनी तुमच्या मनावर रंगांची उधळण केली जाणार आहे. त्यामुळे यंदाही आपल्याला घरीच राहून या रंगांचा आनंद लुटायचा आहे. 

देशभरात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रसरकारने 15 फेब्रुवारीपासून देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपल्या सर्वाना कोरोना नियमांचे पालन करून होळी साजरा करायची. यावर्षीदेखील प्रशासनाला सहकार्य करून होळीचा आनंद लुटुया.  रंगांची उधळण करण्यापेक्षा सकाळ होळी बिट्स  2k21'सोबत तुमची होळी साजरी करा. घरीच राहा, निरोगी रहा. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून होळी साजरी करूया. 
 

संबंधित बातम्या