
Health Tips : सध्या दिवसागणिक हवामान बदलत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम सर्वप्रथम लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ति, अशक्त व्यक्तिवर होतो. हवामान बदलामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार बळावतात. योग्य वेळी योग्य उपचार नाही घेतले तर ताप, न्यूमोनिया या संकटांना तोंड द्याव लागतं.
लहान मुलांना मोठ्यांपेक्षा सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो. खोकला-सर्दीसाठी डॉक्टरकडे नेण्यापेक्षा मुलांवर घरगुती उपचार करणं नेहमी चांगलं असतं. जाणून घेऊ काही घरगुती उपाय.
तुळस आणि काळी मिरी-
तुळस आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवते. सर्दी आणि खोकल्यापासूनही आराम मिळतो. ऋतू बदलामुळे ताप, जुलाब, संधिवात, उलट्या, ऍसिड तयार होणे, हृदयाचे विकार, पाठदुखी आणि त्वचेशी संबंधित समस्या यासारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. काळ्या मिरीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.
आलं-
व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी आल्याचा आहारात समावेश करणं उपयोगी ठरत. आल्यामध्ये एंटी-इंफ्लमेटरी गुण असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा त्रासावर आलं उपयोगी ठरत. आल्याचा चहा घेणही फायद्याच ठरत.
हळद दूध-
सर्दी-खोकला बरा होण्यासाठी दुधात हळद मिसळून प्यावी. कच्ची हळद वापरल्यास तिचा आणखी फायदा होतो. कच्ची हळद उपलब्ध नसेल तर, हळद पावडरही वापरता येऊ शकते.
ओव्याचं पाणी-
सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी लहान मुलाला ओव्याचं पाणी पाजण फार उपयोगी ठरत. एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. हे पाणी थोड्या थोड्या वेळाने 2 ते 4 चमचे पाजत रहा. मोठ्यांसाठी हे प्रमाण अर्धा कप करू शकता. याने सर्दी-खोकल्यात आराम मिळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.