वारंवार येणाऱ्या शिंकांनी त्रस्त आहात? मग ट्राय करा हे घरगुती उपचार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

कोणालाही शिंक येणे येणे सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा वारंवार शिंका येतात, तेव्हा ती डोकेदुखी होऊन जाते. वासाची, धुळीची अ‍ॅलर्जी इत्यादी कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो.

कोणालाही शिंक येणे येणे सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा वारंवार शिंका येतात, तेव्हा ती डोकेदुखी होऊन जाते. वासाची, धुळीची अ‍ॅलर्जी इत्यादी कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. परंतु सामान्य स्थितीत, काही वेळा कोणत्याही कारणांशिवाय काही लोकांना एकाच वेळी बर्‍याच शिंका येतात. ज्यामुळे त्यांच्यासाठी हा त्रास नकोसा  होतो. या समस्येवर मात करण्यासाठी आपण या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. 

पुदीन्याचा वापर 

बर्‍याच शिंका, सतत,एकत्र येण्याचा त्रास टाळण्यासाठी आपण पुदीन्याचे
तेल वापरू शकता. यासाठी दोन ग्लास पाणी घेऊन पॅनमध्ये उकळवा. त्यात पुदीना तेलाचे काही थेंब घाला. या पाण्याची 5 मिनिटे वाफ घ्या. 

हिंग 

वारंवार शिंका येत असल्यास, रुमालमध्ये चार ते पाच चिमूटभर हिंग घाला. दिवसातून या हिंगाचा वास घेत रहा. 

आल्याचा रस आणि गुळ

सारख्या शिंका येत असल्यास दोन ते तीन इंचाचं आलं घ्या, त्याचा रस काढा, त्यात अर्धा चमचा गूळ घाला. दिवसातून दोनदा त्याचे सेवन केल्यास आराम मिळेल.

दालचिनी आणि मध 

आपण दालचिनी आणि मध घेऊन वारंवार येणाऱ्या शिंकांवर उपचार करू शकता. यासाठी, एक ग्लास पाणी गरम करा. त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला आणि एक चमचे मध मिसळा. हे पाणी हळूहळू प्या.

ओवा

एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घाला. हे पाणी उकळून घ्या. 
हे पाणी कोमट असताना गाळून घ्या. नंतर त्यात मध टाका व हे पाणी प्या. 

हळद 
तुंम्हाला वारंवार शिंका येत असल्यास तुम्ही हळदीचे सेवन केले पाहिजे. यासाठी तुम्ही आपल्या खाण्यात हळद वापरावी. गरम दुधात हळद घाला आणि ते नियमितपणे प्या. 
 

संबंधित बातम्या