Summer Fashion: या 5 एक्सेसरीज देतील तुम्हाला उन्हाळ्यात कूल आणि स्टाइलिश लूक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

न्हाळ्याच्या कडक उन्हाने दार ठोठावले आहे. म्हणूनच आपण उन्हाळ्याच्या अनुषंगाने पांढरा आणि हलका रंगाचा पोशाख घालणे गरजेचं आहे. हलक्या पांढऱ्या रंगाचे आउटफिट्स आणि वॉर्डरोब घालणे सुरू केले असेल.

न्हाळ्याच्या कडक उन्हाने दार ठोठावले आहे. म्हणूनच आपण उन्हाळ्याच्या अनुषंगाने पांढरा आणि हलका रंगाचा पोशाख घालणे गरजेचं आहे. हलक्या पांढऱ्या रंगाचे आउटफिट्स आणि वॉर्डरोब घालणे सुरू केले असेल. अणि असा संग्रह जर तुमच्याकडे नसेल तर आम्ही तुम्हाला पाच सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्सेसरीजबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला एक मस्त आणि स्टाइलिश लुक देतील. 

1- हॅट/कैप

जुन्या काळापासून हॅट आणि कॅप उन्हाळ्यात ट्रेंडिंग असते आणि आजही  उन्हाळ्यात हैट/कैप चा ट्रेंड आहे. बकेट हॅट्स आपल्याला एक गोंडस आणि स्टाईलिश लुक देतात. आपण ते काळ्या, पांढर्‍या किंवा कोणत्याही हलका रंगाच्या पोशाखावर वेअर करू शकता. आपल्याला हॅट जास्त आवडत नसल्यास आपण एक कॅप वापरू शकता. कोणत्याही बेसिक आउटफिट वर कॅप छान दिसते.

2- लेयर्ड नेकलेस/ ब्रेसलेट

लहान पेंडेंट आणि हलकी आणि पातळ लेयर्ड चेन  खूप सुंदर दिसते. आपण ते ट्यूब टॉपसह परिधान करू शकता. याव्यतिरिक्त, आपण आपल्या आउटफिट वर शोभून दिसणारे बीडेड ब्रेसलेट घालू शकता. यासह आपण एक साधी अंगठी देखील वेअर करू शकता.

3- बॅंड्स

प्रिंटेड आणि कलरफुल बँड्सदेखील खूप छान लुक देतात. आपण बँड्स डोक्यावर बांधून आणि केसांच्या खाली गाठ घालून सेट करू शकता. यामुळे आपल्याला एक स्टाईलिश लुक येईल आणि उष्णतेच्या प्रभावापासून आपल्या डोक्याचे आणि केसांचे संरक्षण होइल. या व्यतिरिक्त आपण या बँड्सने आपली मान आणि गळा देखील कवर करू शकता. यासाठी बँड्सला गळ्यावर सैल गाठ लावून स्टायलिश लुक द्या.

4- सनग्लासेज

सनग्लासेस आपल्या राहणीमानाच्या शैलीमध्ये चार चांद लावण्याचे काम करतात. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे सनग्लासेस उपलब्ध आहेत. आपल्याला आपल्या  आउटफिटनुसार सनग्लासेज ची निवड करावी लागेल.

5- हॅंडबैग

न्यूड कलरची  स्लिंग बॅग किंवा हँडबॅगची फॅशन कधीही कालबाह्य होत नाही. उन्हाळ्यात ती क्लासी लुक देते. आपल्या आवडीनुसार आपण एक ब्राइट कलर ची हँडबॅग देखील वापरू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की ती आपल्या आउटफिट वर मैच होइल. 

संबंधित बातम्या