Summer Hair Care Tips: चिकट केस, कोंडा सर्व होईल दूर; उन्हाळ्यात केसांसाठी वापरा हा जालीम उपाय

यामुळे तुमच्या केसांना ताकद मिळते. यासोबतच वाढीसही मदत होते.
Summer Hair Care Tips
Summer Hair Care TipsDainik Gomantak

Summer Hair Care Tips: आजकालची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढते प्रदूषण यांचा तुमच्या आरोग्यावर तसेच केसांवरही खूप वाईट परिणाम होतो.

यामुळे तुमचे केस पातळ, पांढरे, कोंडा असलेले आणि चिकट दिसू लागतात.

Summer Hair Care Tips
Daily Horoscope 15 May: नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी चहा पावडरचे पाणी बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. चहापावडरमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या केसांना ताकद मिळते. यासोबतच वाढीसही मदत होते.

लागणारे साहित्य :

  • चहापावडर

  • पाणी

कृती :

  • यासाठी आधी एक भांडे घ्या.

  • मग त्यात दोन कप पाणी टाकून उकळा.

  • यानंतर त्यात टी-बॅग किंवा चहा पावडर घालून मिक्स करा.

  • नंतर 4-5 मिनिटे पाणी उकळू द्या.

  • आता हे पाणी तयार आहे.

केस धुण्यापूर्वी हे पाणी केसाना लावून ठेवा.

त्यानंतर शॅम्पूने केस धुवा.

आठवड्यातून दोनदा हे करा

यामुळे तुमचे केस चमकदार दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com