Summer Health Tips: उन्हाचा तडाखा वाढतोय! या दिवसात अशी घ्या स्वत:ची काळजी

मागील 15 दिवसांपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.
Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak

Summer Health Tips: मागील 15 दिवसांपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. मार्च महिना सुरू होताच देशाच्या काही भागात अचानक तापमानात वाढ होते. यंदाच्या तापमानाची स्थिती पाहता यावेळी कडक ऊन पडणार असल्याचे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत, उष्णतेपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उष्माघाताचा सल्लाही जारी केला आहे. या अ‍ॅडव्हायजरी अंतर्गत आरोग्य मंत्रालयाने अति उष्णतेचा प्रभाव टाळण्यासाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया.

Summer Health Tips
Happy Holi 2023: होळीच्या दिवशी 'या' 5 शुभ वस्तु आणा घरी, होईल धनाचा वर्षाव
  • जास्तीत जास्त पाण्याचे सेवन

पाण्याअभावी उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे व्यक्ती अनेक आजारांना बळी पडू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला उष्णतेपासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर स्वतःला पूर्णपणे हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त पाणी, हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. याशिवाय या दिवसात लिंबू पाणी, लस्सी यांचे सेवन करत राहणे गरजेचे आहे.

Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak
  • सूर्यप्रकाशापासून स्वत:चा बचाव

उन्हाळ्यात होणार्‍या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाणे टाळणे आवश्यक आहे. तसेच दुपारी 12 ते 3 यादरम्यान उन्हात बाहेर पडू नये. यादिवसात तसेच पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा, जेणेकरून तुम्हाला उष्णतेचा कमी त्रास होईल.

Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak
  • चहा-कॉफीचे सेवन टाळा

उष्णतेचा प्रभाव टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय उच्च प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळावे.

Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak
  • मसालेदार अन्न टाळा

उष्णतेची लाट टाळण्यासाठी, मसालेदार अन्नापासून दूर राहा. तसेच, या हंगामात अधिकाधिक वनस्पती-आधारित आहार घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांच्या रसांचा समावेश करा. मसाल्याच्या पदार्थांमध्ये अधिक उष्णता असते त्यामुळे याचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak
  • या दिवसात मांसाहाराचे सेवन करू नका

उन्हाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी मांसाहार कमी करा. याचे मुख्य करना म्हणजे या दिवसात मांसाहारी अन्न पचण्यास बराच वेळ लागतो. अन्न पचण्यास उशीर झाल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे निर्जलीकरण होते.

Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com