Summer Skin Protection : त्वचेचा कर्करोग टाळायचा असेल तर सनस्क्रीन वापरा; योग्य पद्धतीने करा चेहऱ्यावर अप्लाय

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

कडक सूर्यप्रकाश हे त्वचेच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण मानले जाते. आणि सध्या प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जे लोक दररोज कडक उन्हात बरेच तास काम करतात त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

कडक सूर्यप्रकाश हे त्वचेच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण मानले जाते. आणि सध्या प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जे लोक दररोज कडक उन्हात बरेच तास काम करतात त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. त्वचेच्या कर्करोगाच्या  पेशी असामान्यपणे वाढू लागतात.  आणि काळजीची गोष्ट अशी की या पेशी कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्यात आढळून येते. अशा परिस्थितीत, यावर उपचार करणे देखील अवघड होते.

परंतु आपल्याला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की सनस्क्रीन क्रीम आपल्याला त्वचेच्या कर्करोगाच्या जोखमीपासून वाचवू शकते. जर सूर्यप्रकाश जास्त असेल कडक ऊन असेल  तर आपण सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. सनस्क्रीनमध्ये असलेले घटक आपल्या त्वचेचा सूर्याच्या अतिनील किरणांनापासबन बचाव करतात. ती किरणं  थेट आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू देत नाहीत. यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि सनस्क्रीन लावण्याच्या पद्धती आपण जाणून घेवूया.

ही लक्षणे समोर येतात

1. उन्हात बाहेर पडताच खाज सुटणे.

2. वारंवार एग्जिमाची समस्या.

3. त्वचेवरील तीळचा रंग बदलणे.

4. चेहऱ्यावर डाग धब्बे टिकून राहतात.

5. मान, गाल, कपाळ आणि डोळ्या जवळ जळजळणे

संरक्षणासाठी या पद्धती अवलंब करा

1. जास्तीत जास्त पाणी प्या जेणेकरून शरीर डिहाइड्रेट होणार नाही.

2. जेव्हा उन्हात बाहेर पडेल तेव्हा शरीर संपूर्ण कवर करा

3. सनस्क्रीन वापरा आणि तो योग्य प्रकारे योग्य प्रकारचा वापरा

4. हलके अन्न खा, मसालेदार पदार्थ खाणे टाळा, 
5. स्वस्त कॉस्मेटिक्स वापरू नका.

6. उन्हाळ्यात 11 ते 2 वाजता उन्हात बाहेर पडू नका.

 
सनस्क्रीन लावण्याचा योग्य मार्ग 
बहुतेक स्त्रिया त्वचेवर थेट सनस्क्रीन लावतात किंवा मॉइश्चरायझरमध्ये मिसळतात, परंतु दोन्ही पद्धती पूर्णपणे चुकीच्या आहेत. सनस्क्रीन क्रीम लावण्यापूर्वी, मॉइश्चरायझर त्वचेवर चांगले लावावे आणि कमीतकमी 20 ते 30 मिनिटं ते चेहऱ्यावर ठेवावे. जेव्हा त्वचा मॉइश्चरायझर शोषून घेते, तेव्हा सनस्क्रीन क्रीम लावा आणि ती लावल्यानंतर कमीतकमी 20 मिनिटांनी घराबाहेर पडा, जेणेकरून सनस्क्रीन  लावल्यानंतर क्रीमचे युवी फिल्टर्स त्वचा चंगल्या प्रकारे शोषून घेईल. आणि सनस्क्रीन ढाल म्हणून आपल्या त्वचेचे रंक्षण करू शकले.

गोव्यातली टॅटूची दुनिया; जाणून घ्या कलंगुटमधील पाच फेमस टॅटू स्टुडिओ 

संबंधित बातम्या