पुरुषांनी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी करा या सुपरफूडचे सेवन

शारीरिक अशक्तपणामुळे कोणतीही व्यक्ती कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही.
पुरुषांनी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी करा या  सुपरफूडचे सेवन
पुरुषांनी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी करा या सुपरफूडचे सेवन Dainik Gomantak

अनेकवेळा पुरुषांना त्यांच्या आहाराकडे (Diet) आणि फिटनेसकडे (Fitness) लक्ष न दिल्याने शारीरिक कमजोरी जाणवू शकते. यामुळे थकवा, सुस्ती, उर्जेचा अभाव इत्यादी लक्षणे आढळतात. शारीरिक अशक्तपणामुळे कोणतीही व्यक्ती कोणतेही कामे चांगल्या प्रकारे करू शकत नाही. यामुळे लैंगिक जीवनावर देखील परिणाम होऊ शकते. यामुळे पुरुषांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करवा हे जाणून घेवूया.

* तुळशीचे पाने (Basil leaves)

तुळशीच्या रोपाला आयुर्वेदात खूप महत्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे पाने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीचे पाने किंवा त्याचे चूर्ण घेतल्यास आरोग्य चांगले राहते.

* तूप (Ghee)

देशी तुपात फॅटी अॅसिडसह व्हिटॅमिन ए, डी, मिनरल्स, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि व्यक्तीची शारीरिक कमजोरी दूर करण्यास मदत मिळते. तसेच तुपाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते.

पुरुषांनी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी करा या  सुपरफूडचे सेवन
पुरुषांनी या 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये

* केळी (Bananas)

केळीचे सेवन करणे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. केळीमध्ये कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. मुख्यत: केळी पुरुषांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

* खजूर (Dates)

खजूरांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची पचनसंस्था सुरळीत कार्य करते. खजूरमध्ये असलेले अमिनो अॅसिड पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. खजूरचे सेवन तुम्ही दुधासोबत सुद्धा करू शकता.

* मोड आलेले कडधान्य (Modified Cereals)

मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी लाभदायी असते. वजन वाढीसाठी मोड आलेले कडधान्य उपयुक्त ठरते. तसेच पुरुषांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. आरोग्य तज्ञांच्या मते दररोज 50 ग्रॅम मोड आलेले चणे खाल्यास पुरुषांची कमजोरी कमी होते.

Related Stories

No stories found.