टॅटू काढायच्या विचारात असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी महत्वाची

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

टॅटू काढल्यानंतर काहींना सौम्य स्वरूपाची वेदना होता, काहीची त्वचा लाल होते, काहीना पुरळ येते. आता त्यावर उपाय करण्यासाठी आपण काय करू शकतो.

पुर्वीसारखे टॅटू आता कलंकित केले जात नाहीत. ते आता कला मानले जातात. टॅटू काढल्यावर आपल्या त्वचेला वेदना होताता पण नेमकं अशावेळी काय करावं हे कित्येक तरूणांना माहित नसते. टॅटू काढल्यानंतर काहींना सौम्य स्वरूपाची वेदना होता, काहीची त्वचा लाल होते, काहीना पुरळ येते. आता त्यावर उपाय करण्यासाठी आपण काय करू शकतो.

हे करू नका

वेदनाशक आषधे आर्टीस्ट च्या किंवा किंवा  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेवू नका. 

टॅटू काढल्यावर15 दिवस त्या भागाला पाणी, साबण लावायचा नाही. 
व्यायाम करायचा नाही.

मुख्य म्हणजे टॅटू काढल्यावर किमान सहा महिन्यांसाठी रक्तदान करता येत नाही कारण टॅटूचा रंग त्वचेच्या तिसऱ्या थरापर्यंत पोहोचतो. अनेकदा रक्तात रंग मिसळलेला असते. त्यामुळे रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रोफेशनल आर्टिस्ट कडून टॅटू काढा

टॅटू हे प्रोफेशनल आर्टिस्ट कडून न काढल्यास त्याचे भयंकर परिणाम आपल्याला होऊ शकतात. आणि कितीही काळजी घेतली तरी आपल्या त्वचेवर त्याचे परिणाम दिसून येतात जसे कि त्वचा लाल होणे, सतत खाज येणे. 

जर तुम्ही टॅटू काढलात तरी त्या शाई मध्ये असलेल्या केमिकल किंवा प्लास्टिक मुळे सुद्धा एलर्जीक रीऍक्शन होवू शकते आणि कालांतराने त्याच रूपांतर सूज येणे किंवा जखम होऊन त्यातून रक्त येणे अशा घातक स्वरूपाचे लक्षण दिसू लागते.  

ती जखम अजून चिघळण्याची शक्यता दाट असते!

टॅटू करताना स्वस्त  क्वालिटीची शाई वापरली असल्यास किंवा टॅटू जुना झाला असल्यास डॉक्टरकडे तुमचा एमआरआय काढताना अडथळा येऊ शकतो. हे खूप क्वचित आहे त्यामुळे टॅटू काढतांना  वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं.

योग्य ठिकाणी टॅटू न काढल्याने होणारे दुष्परीणाम

प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट तोच असतो जो आपल्या कस्टमरची काळजी घेऊन टॅटू कुठे काढला पाहिजे आणि कुठे नाही याबाबत सल्ला देतो! काही लोकं फक्त पैशासाठी लोकं सांगतील तसा आणि तिथे टॅटू काढतात

टॅटू काढण्याआधी खालील काळजी नक्की घ्या 

  • 1 टॅटू काढण्यापूर्वी हिपॅटायटीस बी चे इंजेक्शन घ्यावे.
  • 2 हे प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट (Professional tattoo Artist) कडूनच बनवून घ्या.
  • 3 स्वच्छतेची काळजी घ्या.
  • 4 टॅटू बनविलेल्या ठिकाणी नेहमी Antibiotic Cream लावा.

होळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी 

संबंधित बातम्या