'या' गोष्टींवर नियंत्रण न ठेवल्यास होईल मानसिक त्रास
'या' गोष्टींवर नियंत्रण न ठेवल्यास होईल मानसिक त्रास Dainik Gomantak

'या' गोष्टींवर नियंत्रण न ठेवल्यास होईल मानसिक त्रास

तुम्हाला जर मानसिक ताणापासून मुक्ती मिळवायची असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात.

आपण जगातील प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे चालवू शकत नाहीत. हे खरे देखील आहे, परंतु आपल्या प्रतिक्रियांबद्दल नियंत्रण ठेवून आपण स्वत:शी संबंधित गोष्टी आपल्या मर्जीनुसार चालवू शकतो. जर आपण आपल्या प्रतिक्रिया, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलो तर आपण मानसिक आरोग्याची (Mental Health) काळजी घेवू शकतो. मग आपल्याला अनेक मानसिक ताणापासून (Mental Tress) मुक्ती मिळेल. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या गोष्टीवर आपण नियंत्रण ठेवायला पाहिजेत.

* एखाद्याला पाहून जळणे ( Jealously)

एखाद्याला पाहून जळजळ होणे किंवा चिडून तर काही होणार नाही. याउलट तुमचे नुकसान होऊन तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. यामुळे आपल्या नकारात्मक भावनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

* भविष्याबद्दल नकारात्मक विचार

तुम्ही जर आपल्या भविष्याबद्दल नकारात्मक विचार करत असाल तर असा विचार करणे आधी बंद करावे. कारण यामुळे तुमच्या मेंदूवर ताण येवून तुम्हाला मानसिक समस्येला सामोरे जावे लागू शकते. अनेक लोकांना भविष्याबद्दल काळजी करायची सवय असते, विशेषत: जेव्हा ते एखाद्या वाईट प्रसंगातून जात असतात.

'या' गोष्टींवर नियंत्रण न ठेवल्यास होईल मानसिक त्रास
लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत

* कोणाला तरी फसवणे

दुसऱ्याला फसवणारे लोक, स्वत:च एक दिवस फसतात. सुरुवातीला फसवणूक करून कितीही गोष्टी केल्या तरी अशा लोकांमध्ये नकारात्मक भावना वाढत जाते. नंतर त्यांना अपराधीपणा वाटू लागते आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य (Mental Health) बिघडू लागते.

* वाईट घटनांचा विचार करणे

आपल्याला आयुष्यात भूतकाळातील अनेक चांगल्या आणि वाईट आठवणी असतात. पण यातील काही वाईट आठवणीचा सारखा विचार करून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. यामुळे मानसिक आरोग्य (Mental Health) बिघडते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com