कोरोना काळात ऑक्सिजनची लेवल वाढवण्यासाठी करा हे' उपाय 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

करोनासारख्या महामारीमध्ये  आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य निरोगी ठेवायचे असेल आणि रोगप्रतिकरकशक्ति वाढवायची असेल तर शरीरातील ऑक्सिजनची (Oxygen) लेवल वाढवणे महत्वाचे आहे

कोरोनासारख्या महामारीमध्ये  आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य निरोगी ठेवायचे असेल आणि रोगप्रतिकरकशक्ति वाढवायची असेल तर शरीरातील ऑक्सिजनची (Oxygen) लेवल वाढवणे महत्वाचे आहे. यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आहारात घेतल्या पाहिजेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.  (Take these measures to increase the level of oxygen during the corona period) 

कोरोना लसीकरणामुळे स्त्रियाच्या मासिक पाळीमध्ये होऊ शकतात हे बदल? 

 1) रताळे - ऑक्सिजन लेवल वाढण्याकरीता रताळ्याचा आहारात समावेश करावा. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे तसेच ऑक्सीजनचे स्तोत असतात. 

2) लसूण - लसून चे अनेक फायदे आहेत. याच्या आहारात नियमित सेवन केल्याने सर्दी, खोकला, गॅस, सांधेदुखी सारख्या सर्व वेदनांतून आराम मिळतो. तसेच लसूण शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढवण्यास मदत करतो. भाजी बनवताना लसूण टाकल्यास भाजी चवीला चवदार होते. यामुळे लसूण चा वापर हा नेहमी स्वयंपाक घरात  होत  असतो. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. 

3) लिंबू - लिंबूमध्ये  व्हिटॅमिन "सी"  (c) भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे लिंबू खाल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे दिवसातून  कमीत-कमी दोन वेळा तरी लिंबू खेळ पाहिजे. 

4) केली - केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स  देखील असतात. केळी खाल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढण्यास  मदत होते. 

उन्हाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, वाचा सविस्तर

5) किवी -  किवी फळ खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. हे फळ ऑक्सिजन लेवल वाढवण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन "सी" (c) देखील भरपूर प्रमाणात असते.  

6) दही - आपल्या सर्वाना महहिती आहे की दहीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन (Vitamin) आणि कॅल्शियम  असतात. परंतु फार कमी लोकाना हे माहिती आहे की, 
दहयाचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिजनची  कमतरता दूर होते. दहयामुळे  ऑक्सिजन लेवल वाढण्यास मदत होते. 

   अनेक डॉक्टरांनी  देखील करोना काळात जास्तीत जास्त प्रमाणात व्हिटॅमिन "सी" (c) समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिल आहे. 

संबंधित बातम्या