रोज सकाळी दुधात एक चम्मच मध घेतल्यास होणार पुरुषांचा ताणतणाव दुर

Taking a teaspoon of honey in milk every morning will relieve the stress of men
Taking a teaspoon of honey in milk every morning will relieve the stress of men

मध आणि दुधाचे फायदे आपल्याला निरोगी बनवू शकते. सगळ्यांच्याच घरी दुध आणि मध उपलब्ध असते. आपल्याला हे माहित असलेच की दुधामध्ये अ, ब आणि डी जीवनसत्त्व, लैक्टिक असिड, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक प्रकारचे पोषक तत्त्वे असतात. त्याचप्रमाणे मधातही बर्‍याच प्रकारचे पोषक तत्व असतात. ज् तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. उदाहरणार्थ, लोह, कॅल्शियम, फॉस्फेट, फळ ग्लूकोज, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम इ. इतकेच नाही तर सहद अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल देखील आहे. दूध आणि मधाचे सेवन केल्यास पुरुषांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर होवू शकते.

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी
अभ्यासात असे दिसून आले आहे की जर पुरुषाने दूध आणि मध एकत्र मिसळून त्याचे सेवन केले तर त्यांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. 

चांगली झोप मिळण्यास मदत होते
असे म्हणतात की झोपेच्या सुमारे एक तासापूर्वी दूध आणि मध घेतल्यानंतर चांगली आणि शांत झोप लागते.

दृष्टी वाढण्यास मदत

दूध आणि मध खाणे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय कफ, उच्च रक्तदाब आणि दम्याच्या समस्येसाठी देखील दूध आणिमधाचे सेवन करणे गरजेचे आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

दुध-मधाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांशी लढण्यास मदत मिळते.

 हाडे मजबूत राहतात

अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की नियमितपणे दूध आणि मधाचे सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.

ताणतणाव कमी होतो

कोमट दुधात मध मिसळून प्याल्याने ताण कमी होतो. तसेच मज्जासंस्था आणि मज्जातंतूंच्या पेशींनाही आराम मिळतो. यामुळे मानसिक क्षमता देखील वाढते.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची संख्या वाढते
अभ्यासात असे दिसून आले आहे की दूध आणि मध एकत्र पिल्याने टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळए पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढविण्यास मदत होते. दूध आणि मध नियमित सेवन केल्यास शरीर सक्रिय राहते आणि ताकत वाढते. तसेच बुध्दीमत्ता देखील वाढते.

डायजेशन दुरूस्ती

आपण कोमट दुधात मध टाकून पिऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दुर होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com