तुम्हाला सर्वांना माहितच आहे की रंगांचा उत्सव म्हणजेच होळी जवळ आली आहे. आपल्याला हेही माहिती आहे की होळी रंगांशिवाय अपूर्ण आहे, पण आपल्या आरोग्याची काळजी घेणही तेवढच गरजेचं आहे. होळी हा भारतातील दुसर्या क्रमांकाचा मोठा सण मानला जातो, आणि देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पिचकारी ही होळीतील लहान मुलांची पहिली पसंत आहे, लहान मुलांना होळीला पिचकारी घेवून होळी खेळायला आवडते. मुलांना मुख्यतः गन पिचकारी आणि पंप पिचकारी चालवायला आवडते. तर मोठ्यांना आणि तरूणांना एकमेकांना रंगात भिजवायला आवडते. एकमेकांना रंग लावायला आवडते.
मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव बघता देशातील अनेक राज्यात करोना निर्बंध लावले गेले आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यत सगळ्यांच्या आनंदावर पाणी फेरल्या गेले आहे. कारण शासनाने होळी दरम्यान जमावबंदी करण्यास कडक निर्बंध लावले आहे. आणि ते आपल्या हिताचे आहे. कारण आपल्याला कोरोना संकटाचा सामना एकत्र मिळून करायचा आहे. शासन आणि प्रशासनाला सहकार्य करायचे आहे.
पण तुम्ही नाराज नका होवू, आपण घरी बसून यावर्षीचा शिमगा खूप मजेत आणि आनंदात साजरा करू शकतो. तो कसा, ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, कारण आम्ही तुमच्यासाठी एक खास भेट घेवून आलोय. जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती शक्य नाही. आणि घरी बसून होळीला आनंद मिळविणे हि तर खूपच सोपी गोष्ट आहे. आपल्यावर कोरोनाचे संकट आले असले तरी आपण त्यावर म्युझीकल थेरी करून मात करू शकतो.
देशात आणि राज्यात कोरोनाचे निर्बंध लावले आहे. मुंबई महापालिकेने रंगूया सुरक्षेच्या रंगात असे म्हणत नागरिकांना जमावबंदी करण्याचे आँणि घरीच होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांनी होळी साजरी करतांना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावण्याचा उत्साह, खाण्यापिण्याची मजा एकत्र येवून नाच गाणं करता येणार नाही, मात्र तुम्ही नाराज नका होवू आम्ही यावर एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी काढला आहे.
शासनाने जमावबंदि करण्यास मनाई केली आहे. पण घरी बसून होळी साजरी करायला नाही. आणि जगात म्युझीक ही एक अशी गोष्ट आहे, असा रामबाण उपाय आहे की, या म्युझीक ची जादू सगळ्यांच्या मनावर राज्य करते. हर बुरी हालात कि दवा म्हणून गाण्याकडे संगिताकडे बघितलं जाते. आणि आजकाल तर तरूणाईला बॅंडच प्रचंड वेड आहे. बॅंड वाजवायला ऐकायला आवडतं. म्हणून असाच होळीच्या उत्सवावर सुरांचा, संगिताचा बॅंड वाजवून घरीच नाचून गाऊन होळी साजरी करूया. कोरोनाने आपल्या होळीच्या रंगाचा जरी बॅंड वाजवला असला तरी, आपण Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाचा आनंद घेवून यंदाची होळी उत्साहात साजरी करूया.
संगित आपल्या जगण्यात, आनंदात भर टाकते. तर होळी निमित्त एक म्युझीकल ट्रिट येत्या 28 तारखेला म्हणजेच रविवारला म्हणजेत होळीला आम्ही तुम्हाला देणार आहोत. झुमेंगे नाचेंगे पण घरीच बसून. कोरोनाचे नियम पाळून या वर्षाची होळी साजरी करण्यासाठी आपण सगळे पर्यत्न करीत आहेत. आणि म्हणूनच या उपक्रमात हातभार म्हणून येणाऱ्या होळीला आम्ही तुम्हाला सुरांच्या रंगात रंगविणार आहोत. या वर्षीची होळी रंगे सुरासंगे. होळीच्या रंगासोबत असणार सुरांचा रंग. संगित रससुरात वाहून जाण्यास आपण सज्ज आहात ना? यावर्षी रंग उधळूया. गाणी गावूया, संगिताचा आनंद घेवूया होळी साजरी करूया, शासन प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी जमाव न करता, 2021 ची होळी साजरी करूया.