The Gut-Brain Connection: पोटातील जिवाणू ठरवतात माणसाचे वागणे

गट मायक्रोबेटा नावाचे जिवाणू अन्न पचवण्याची आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याची जबाबदारी घेतात
The Gut-Brain Connection
The Gut-Brain ConnectionDainik Gomantak

The Gut-Brain Connection: लाखो जीवाणू आपल्या पोटात राहतात. खासकरुन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये हे विषाणू असतात. शास्त्रज्ञांचा मते अंदाजे 30 ट्रिलियन ते 400 ट्रिलियन पर्यंत हे विषाणू असू शकतात. गट मायक्रोबेटा नावाचे हे जिवाणू आईच्या गर्भाशयात नसतात परंतु बाळ जन्मल्यावर ते अन्न पचवण्याची आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याची जबाबदारी घेतात.

The Gut-Brain Connection
South Goa District Collector: जिल्हाधिकाऱ्यांचा फर्मान, 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडे मागितले 1000 रुपये!

गट मायक्रोबेटा नावाचे हे जिवाणू आईच्या दुधाद्वारे बाळाच्या आतड्यांपर्यंत पोहोचतात. तेव्हापासून ते अन्न पचवण्याची आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याची जबाबदारी घेतात. त्यांना चांगले बॅक्टेरिया देखील म्हणतात.

आतड्याचे बॅक्टेरिया सुरुवातीला फक्त पचनाशी संबंधित दिसले, परंतु नंतर आतडे-मेंदूशी कनेक्शन असल्याचे दिसून आले. माइक्रोबेटा एंड गट-ब्रेन एक्सिस या नावाने प्रकाशित झालेल्या संशोधनात आतड्यांमध्ये आढळणाऱ्या बॅक्टेरियाचा मेंदूशी काय संबंध आहे हे सांगण्यात आले.

व्हॅगस मज्जातंतू यासाठी थेट मार्ग म्हणून कार्य करते, जी आतड्यांमधील हालचालींचे सिग्नल थेट मेंदूपर्यंत पोहोचवते. गट हॉर्मोन्स, सीसीके, घ्रेलिन आणि 5-एचटी सारखे आतड्याचे संप्रेरक देखील यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत सर्वाधिक संशोधन उंदरांवर झाले आहे आहे.

The Gut-Brain Connection
Goa Congress : गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गोव्यात दाखल; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले स्वागत

आतड्याच्या संकुचित नलिकांमध्ये राहणारे जीवाणू मेंदूवर का आणि कसे परिणाम करतात? याचे निश्चित उत्तर सध्या शास्त्रज्ञांकडेही नाही. काही वर्षांपूर्वी सूक्ष्मशास्त्रज्ञ जेन फॉस्टर यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत उंदरांच्या दोन गटांवर प्रयोग केला होता. एका गटातील उंदरांच्या आतड्यात बॅक्टेरिया होते, तर दुसऱ्या गटातील उंदरांच्या आतड्यात बॅक्टेरिया न्हवते.

काही वेळातच असे दिसून आले की, ज्यांच्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया होते ते उंदीर अधिक अस्वस्थ झाले होते. ते लवकर निर्णय घेऊ शकत नव्हते आणि ते अधिक आक्रमक होते. शास्त्रज्ञांनी दोन्ही गटांना एका चक्रव्यूहात टाकले आणि त्यातून असे आढळले की, बॅक्टेरिया नसलेल्या उंदीरांचा दुसरा गट काही वेळातच बाहेर पडला तर बॅक्टेरिया असलेले उंदीर बराच वेळानंतर मार्ग शोधत बाहेर पडले.

The Gut-Brain Connection
Pernem Crime: विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाला अटक; पेडण्यातील घटना

कॅनडाच्या मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रयोगात प्रथमच अन्न-पचन करणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या इतर कार्यांबद्दलही चर्चा करण्यात आली. ते एक प्रकारचे मेंदूचे धुके तयार करतात, ज्यामुळे मन अस्वस्थ होते आणि त्वरित निर्णय घेण्यास असमर्थ होते.

यावरुन एकंदरीत असे लक्षात येते की, पोटातील बॅक्टेरिया हे केवळ अन्न पचवण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच काम करत नाहीत तर ते गुप्तपणे आपल्या मेंदूलाही नियंत्रित करत आहेत. यालाच आतडे-मेंदू अक्ष म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com