चित्र खरोखरच बोलतात!
PaintingDainik Gomantak

चित्र खरोखरच बोलतात!

झाडांच्या गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर, देवळाचाच भाग बनून येणाऱ्या आकाशाच्या निळाईने चित्रांमधला अवकाश स्पष्ट केला आहे.

प्रतीक च्यारी ‘गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट’च्या (Goa College of Fine Arts) प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्या चित्रातून (Painting) त्याची रंग-रेषे बरोबर असणारी मैत्री जाणवते. त्याने केलेली चित्रे तो समाजमाध्यमांवरून सातत्याने प्रदर्शित करत असतो. हल्ली त्याच्या एका उल्लेखनीय चित्राला तालुका पातळीवर असे पारितोषिकही मिळाले. पारितोषिक तालुका पातळीवरील असले तरी कमीत कमी घटक वापरून त्याने त्या चित्रात मांडलेल्या आशयामुळे ते चित्र लक्षवेधी झाले होते. अर्थात त्याच्या चित्रांमधून व्यावसायिक सफाई अजून दिसून येणे बाकी असले तरी रंग, विशेषत: जलरंग, हाताळण्याच्या त्याच्या पद्धतीवरून त्याचे कौशल्य नक्कीच नजरेस येते.

Painting
जनांचा ओघ वाढला...

दैनिक गोमन्तकच्या ‘रंगदेखणी’साठी त्याने खास दिलेले, देवळाच्या शीर्ष भागाचे हे चित्रही प्रतीकच्या ‘मिनिमलिस्ट’ शैलीचे उदाहरण आहे. काही अवघे रंग आणि त्यांच्या छटा वापरून त्याने देवळाच्या कळसाच्या बाजूचे आयाम सहजतेने मांडले आहेत. झाडांच्या गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर, देवळाचाच भाग बनून येणाऱ्या आकाशाच्या निळाईने चित्रांमधला अवकाश स्पष्ट केला आहे.

प्रतीकला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. सहा वर्षे वयाचा असताना तो बालभवनचा विद्यार्थी होता. मात्र त्यावेळी चित्रकला म्हणजे त्याच्या दृष्टीने एक मौज होती. त्यानंतर शाळेत आठवीत असताना त्याला अमोघ बुडकुले हे शिक्षक भेटले. ते स्वतः चित्रकार होते. प्रतीक म्हणतो, अमोघसरांनी त्याला चित्रांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली. रंगांवर प्रेम करायला आणि त्यांच्याबरोबर खेळायला शिकवले. त्यांनीच प्रतीकला ‘फाईन आर्ट’च्या औपचारिक शिक्षणाच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com