कोरड्या खोकल्यावर 'हे' आहेत जबरदस्त घरगुती उपाय

dry cough
dry cough

Health Care Tips : सध्या देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. त्यामुळे अनेकांना वातावरणातील बदलामुळे अनेक आजार उद्भवतात. पावसात भिजल्याने अनेकांना सर्दी , खोकल्याचा त्रास होतो. परंतु खोकला जर कमी झाला नाही तर लगेच तज्ञाचा सल्ला घ्यावा. अनेकांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. यामुळे अनेकांच्या पोटात आणि छातीत दुखणे असे इतर त्रास होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे खोकला होण्याची भीती आहे. इतरवेळी साध्या उपचारणे खोकला बरा होतो. पण, अनेकवेळा हा त्रास कमी होत नाही. कोरड्या खोकल्याचा त्रास असल्यास , काही घरगुती उपयांनी तो बरा होऊ शकतो.  (These are great home remedies for dry cough)

- कोरड्या खोकल्याचा त्रास होत असल्यास पिंपळाच्या गाठीचा वापर करावा. पिंपळाची  गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून याचे मिश्रण नियमित घ्यावे. यामुळे कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो. 

- कोमट पाण्यात मीठ मिसळुन गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो. तसेच मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात साचणारा कफ कमी होण्यास मदत मिळते. दिवसातून 3 ते  4 वेळ असे केल्यास लवकर आराम पडतो. 

- आलं हे स्वयंपाक घरातील महत्वाचा पदार्थ आहे. काळी मिरी आणि आल्याचा चहा घेतल्यास खोकला कमी होण्यास मदत होते. परंतु याचा वापर योग्य प्रमाणात करावा. 

- पेपरमिंटमुळे घश्यातील जळजळ कमी करण्यास मदत करते. तसेच दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिंटचा चहा प्यावा. 

- नारळाच्या तेलात निलगिलीच्या तेलाचे 1/2 थेंब टाकून छातीवर मसाज करावे. तसेच गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफ घ्यावी. यामुळे श्वासोच्छवास घेण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com