अ‍ॅपल व्हिनेगर सेवन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

अ‍ॅपल व्हिनेगर सेवन करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते आपण बघूया...

अ‍ॅपल व्हिनेगर हे अतिशय गुणकारी मानले जाते, वजन कमी करण्यासाठी, मधुमेह, मुरुम, त्वचा पांढरी होणे आणि डोक्यातील कोंडा कमी करणे यासारख्या अनेक समस्या कमी करण्यासाठी अ‍ॅपल व्हिनेगरची मदत होते. मात्र हे सेवन करण्यापूर्वी, जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याच्या गुणाऐवजी त्याच्यापासून हानी आपल्याला पोहोचवू शकते. अ‍ॅपल व्हिनेगर सेवन करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते आपण बघूया...

सकाळी ब्रश केल्यानंतर लगेच हे पेय घेवू नका

अ‍ॅपल व्हिनेगर ब्रश केल्यावर लगेच सेवन करू नये. जर आपण असे केले तर आपण आपले दात दुखू शकते आणि दुखणे वाढीची त्रास आपल्याला होवू शकतो. ब्रश केल्यानंतर कमीतकमी अर्धा तासनंतर तूम्ही हे सेवन केले पाहिजे.

रात्री झोपायच्या आधी लगेच पेय घेवू नका

आपण झोपायला जात असताना देखील व्हिनेगर सेवन करू नये. जर आपण हे केले तर आपल्याला पोटात त्रास होऊ शकतो. झोपायच्या  कमीतकमी 1 तास आधी हे व्हिनेगर आपण पिले पाहीजे.

हे पेय प्रमाणात पिले पाहिजे

व्हिनेगर पितांना ते प्रमाणात घेण्याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. हे पेय फार अधिक प्रमाणात घेऊ नये. थोड्या प्रमाणात तुमच्या पोटात कुठल्या प्रकारची समस्या उद्भवत नाही याची आधी खात्री करा

जेवणानंतर लगेच हे पेय घेवू नये

अ‍ॅपल व्हिनेगर जेवणानंतर लगेच घेवू नये. जर तुम्हाला प्यायचे असेल तर ते रिकाम्या पोटी प्या.

चहा आणि कॉफी नंतर हे पेय घेवू नये

अ‍ॅपल व्हिनेगर चहा किंवा कॉफी पिल्यानंतर लगेच पिवू नका कारण त्यातील कॅफिन आपल्या पाचन शक्तिवर परिणाम करू शकते.

आंबट फळे खाल्यानंतर हे पेय घेणे टाळा

जर तुम्ही लिंबू आणि संत्रासारखे कोणतेही आंबट ज्यूस किंवा फळ खात असाल तर त्यानंतर लगेच तुम्ही अ‍ॅपल व्हिनेगर हे पेय पिवू  नये. कारण व्हिनेगरमध्ये आधीच भरपूर  प्रमाणात  एसिटिक एसिड  असतो.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संबंधित बातम्या