या वाईट सवयींमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या होते कमी; जाणून घ्या

Men's Sperm Count : पुरुषांच्या काही वाईट सवयींचा त्यांच्या शुक्राणूंच्या संख्येवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Men's Sperm Count
Men's Sperm CountDainik Gomantak

Men's Sperm Count : आपल्या रोजच्या काही सवयी आपल्याला अडचणीत आणू शकतात. पुरुषांच्या काही वाईट सवयींचा त्यांच्या शुक्राणूंच्या संख्येवर वाईट परिणाम होऊ शकतो. ज्यामध्ये अतिरिक्त ताण, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि काही व्यसनांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत स्वत:च्या जीवनशैलीतील काही सवयी बदलणे गरजेचे आहे. (These bad habits reduce sperm count in men)

Men's Sperm Count
व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे येऊ शकतो थकवा

अति तणाव घेणे

पुरुषांमध्ये तणावामुळे शुक्राणूंची संख्या कमी असू शकते. कारण चिंता आणि तणावामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे आजपासूनच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तणावापासून दूर राहा.

व्यायाम न करणे

व्यायाम न केल्यामुळे पुरुषांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. लठ्ठपणामुळे, शुक्राणूंची गतिशीलता कमी होते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या लैंगिक जीवनावर होतो. म्हणूनच तुम्ही आजपासूनच एका जागी बसण्याची सवय सोडून द्या, त्यामुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते आणि तुमचे वजन वाढू लागते. अशा स्थितीत पुरुषांनी रोज व्यायाम करावा.

मद्यपानाची सवय

ड्रग्ज, अल्कोहोल आणि तंबाखूचा दीर्घकाळ वापर पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. या सवयींमुळे तुम्हाला गंभीर आजारही होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हीही रोज दारू किंवा तंबाखूचे सेवन करत असाल तर ही सवय आजच सोडली पाहिजे.

रात्री उशिरा झोपण्याची सवय

रात्री उशिरा झोपल्यामुळे तुम्हाला तणाव आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते, ज्यामुळे तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. यासोबतच रात्री जागरण केल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुमच्या स्पर्म काउंटवरही परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com