Healthy Tips: मीठ, साखरमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका

Cancer Risk Increasing Foods: निरोगी आरोग्यासाठी कोणत्याही पदार्थांचे सेवन अति करू नये.
Healthy Tips: मीठ, साखरमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका
Cancer Risk Increasing FoodsDainik Gomantak

निरोगी राहण्यासाठी आहारात काय घ्यावे हे माहिती असणे आवश्यक असते. यासोबतच कोणत्या गोष्टी खाणे टाळावे याचेही भान असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काही गोष्टी अशा मानल्या जातात, ज्यांचे अधिक सेवन केल्याने काही आजार होऊ शकतात. अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे जास्त सेवन अधिक केल्याने कर्करोगाचा आजार वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत. (Cancer Risk Increasing Foods News)

* हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल

याचा वापर अन्न पदार्थ दीर्घ काळ ताजे ठेवण्यासाठी केला जातो. संशोधनात असे आढळून आले की हायड्रोजनयुक्त व्हेजिटेबल ऑइल कर्करोगाचा (Cancer) धोका वाढू शकतो. याचे अतिसेवन कर्करोग, हृदयरोग आणि प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते.

oil
oilDainik Gomantak

* मीठ

मीठाशिवाय जेवणाला चव येत नाही. पण मिठाचे अतिसेवण आरोग्यासाठी (Health) धोकादायक ठरू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने गॅस्ट्रिक कॅन्सर वाढू शकतो. तसेच यामुळे कोलन कॅन्सरचा आजार होऊ शकतो. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी मिठाचे सेवन करू नये.

solt
soltDainik Gomantak

* साखर

साखरचे अतिसेवन केल्याने कर्करोगवाढू शकतो. तसेच साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. जास्त साखर खाल्ल्याने तुमचे वजनही झपाट्याने वाढते. यामुळे कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो .

sugar
sugar Dainik Gomantak

* मैदा

पेस्ट्री, ब्रेड,बिस्किट यांसारख्या पदार्थामध्ये मैदा सर्वात जास्त असतो. प्रक्रिया केलेले पांढरे पीठ उच्च ग्लायसेमिक दरामुळे इंसुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी दोन्ही वाढवते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरात कर्करोगाच्या गाठी वाढणे सोपे होते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने इन्सुलिनचा प्रतिकार होतो, ज्यामुळे तुमचा कोलन कॅन्सर तसेच किडनी कॅन्सर सारख्या इतर कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

maida
maida Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.