Palmistry: 'या' लोकांना कष्ट न करता मिळते भरपूर संपत्ती, सासरकडूनही मिळतात पैसे

Palmistry
Palmistry Dainik Gomantak

ज्योतिषशास्त्र (Astrology) हे भारतीय प्राचीन शास्त्रातील एक प्रगल्भ शास्त्र आहे. त्याचीच हस्तरेषा शास्त्र (Palmistry) ही एक शाखा आहे. यामध्ये तळहाताच्या रेषा, आकार आणि खुणा यांचा अभ्यास केला जातो. हस्तरेषेद्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. असे काही लोक आहेत ज्यांना कष्ट न करता भरपूर पैसा (Money) मिळतो तसेच, सासरच्या मंडळींकडून देखील भरपूर पैसे मिळतात. चला तर मग कोण आहेत ही भाग्यवान मंडळी जाणून घेऊयात.

हाताच्या 'या' रेषा मिळवून देतात संपत्ती

अशी लोकं ज्यांच्या हातात गुरु पर्वतावर वर्तुळाकार चिन्ह आहे. ते जीवनात मोठ्या संपत्तीचे मालक बनतात. या लोकांना सासरच्या लोकांकडून देखील भरपूर पैसे मिळतात. करिअरमध्ये उच्च पद मिळते. तसेच, ज्या लोकांच्या हातात शनीच्या पर्वतावर वर्तुळ आहे, त्यांना अचानक धनप्राप्ती होते. त्यांना लॉटरी जिंकण्याची अधिक शक्यता असते. गुंतवणुकीचेही (Investment) फायदे होतात. अशी हस्तरेषा शास्त्रात मान्यता आहे.

Palmistry
Mapusa: पोलिसांकडून जेष्ठ नागरिकांना महत्वाचे फोन नंबर कार्ड वाटप

'या' लोकांना मिळते प्रचंड प्रसिद्धी

हातात गुरू, शनि आणि सूर्य पर्वतावर वर्तुळाचे चिन्ह असणे लाभदायक आहे. अशा लोकांना प्रचंड प्रसिद्धी (Popularity) मिळते. त्यांच्या चांगल्या कामांमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळते. बुध पर्वतावर वर्तुळ असणे व्यवसायात चांगला नफा मिळवून देते, हे लोक भरपूर पैसा कमावतात.

Palmistry
मासेमारी बंदी संपली; पुन्हा कामगारांची प्रतीक्षा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com