Vastu Tips: वास्तूशास्त्रातील 'या' टिप्स तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी करतील दूर

Vastu Tips: वास्तूशास्त्रातील 'या' टिप्स तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी करतील दूर

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्र (Vastushashtra) हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा यावर आधारित आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे घरात सुख-समृद्धी येते तर नकारात्मक ऊर्जा जीवनात अनेक समस्या घेऊन येते. घराची वास्तू खराब असेल तर ती व्यक्ती नेहमी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते. विशेषत: बेडरूमची वास्तू खराब असल्यास त्याचा वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टी वैवाहिक जीवन बिघडवण्याचे काम करतात.

बेडरूम हा घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. पती-पत्नीचा जास्तीत जास्त वेळ इथेच जातो, त्यामुळे त्याच्या वास्तूकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये खिडकी असणे आवश्यक आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो.

Vastu Tips: वास्तूशास्त्रातील 'या' टिप्स तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी करतील दूर
सच्चा गणेशभक्त! लालबाग राजाच्या दर्शनासाठी 770 किमी केला पायी प्रवास

वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने बेडरूममध्ये सुंदर फुलांची भांडी ठेवावीत. हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते आणि ते वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव करतात. याशिवाय एका सुंदर भांड्यात स्फटिक आणि थोडासा तांदूळ ठेवल्यानंतरही पती-पत्नीमधील प्रेम (Husband-Wife Love) अधिक वाढते.

पती-पत्नीमध्ये अंतर निर्माण होत असेल तर बेडरूममध्ये दोन लाल रंगाच्या मेणबत्त्या लावा. यामुळे दोघांमधील नातं अधिक दृढ होते. याशिवाय बेडरूममध्ये काचेचे भांडे ठेवा आणि त्यात छोटे दगड ठेवा. असे मानले जाते की यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते.

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये पाणी असलेली चित्रे लावू नयेत कारण त्यामुळे पती-पत्नीमध्ये स्थिरता येत नाही. त्याऐवजी जोडपी पक्षांचा फोटो लावावा, यामुळे पती-पत्नीमधील प्रेम कधीच कमी होत नाही.

Vastu Tips: वास्तूशास्त्रातील 'या' टिप्स तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी करतील दूर
CM Pramod Sawant: कोलवळ कारागृहाचा भार आता एसपी सांभाळणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com