चेहऱ्याला चुकूनही लावू नका या गोष्टी; त्वचेला होईल नुकसान

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

चेहरा चमकदार आणि उजळ करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु कधीकधी ते प्रयोग फसतात आणि चेहर्याचे सौंदर्य सुधारण्याऐवजी खराब होते.

चेहरा चमकदार आणि उजळ करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु कधीकधी ते प्रयोग फसतात आणि चेहर्याचे सौंदर्य सुधारण्याऐवजी खराब होते. अशा काही गोष्टींबद्दल जाणून घ्या की जर चेहऱ्यावर वापरल्यास तुमची त्वचा खराब होईल आणि तवचा उजळ न होता, आणखीनच गडद दिसू लागेल.

लिंबू : काही लोक लिंबाच्या सालाने थेट चेहऱ्यावर मालिश करतात किंवा चेहऱ्यावर लिंबाचा रस लावतात. लिंबाचा वापर थेट चेहऱ्यावर कधीच केला जात नाही. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर फरक पडतो आणि त्वचेचा रंग गडद दिसतो.

गरम पाणी : काही लोकांना गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय असते. कोमट पाण्याने तोंड धुतल्यामुळे त्वचेतील ओलावा दूर होतो आणि चेहऱ्यावर कोरडेपणा येतो. त्यामुळे, नेहमी थंड पाण्यानेच चेहरा धुवावा. गरम पाण्याऐवजी वाफ घेणे चांगले. 

टूथपेस्ट : चेहऱ्यावर मुरुम किंवा तारूण्यापिटीका आल्यास  
बहुतेकदा लोक टूथपेस्ट लावतात. टूथपेस्टमुळे त्या ठिकाणी काळे डाग पडू शकतात.

मेण : चेहर्यावर मेण लावणेदेखील टाळावे. चेहऱ्याची त्वचा खूप मऊ असते. मेणामुळे यामुळे चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते.

या गोष्टींमुळे येईल तुमच्या चेहऱ्यावर चमक

  • 1.दररोज कच्च्या दुधासह चेहरा साफ केल्यास रंग उजळतो, तसेच त्वचा चमकदार होते.
  • 2. चिरंजी धान्य देखील त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. त्यासाठी चिरंजीला रात्रभर पाण्यात भिजवा.सकाळी पीसून दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. काही दिवसात रंग गोरा होण्यास सुरूवात होईल.
  • 3.संत्र्याची साल वाळवून, मिक्सरमधून काढून त्याची पावडर करा. या पावडरमध्ये दूध आणि मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 
  • 4. दही आणि बेसन देखील चेहरा सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. ते वापरल्याने त्वचेची  गुणवत्ता सुधारते.
  • 5. रात्री लाल मसूर भिजवून ठेवा, सकाळी ते पिसून त्यात दूध मिसळा आणि पॅक सारखे चेहऱ्यावर लागू. यामुळे चेहर्‍याची त्वचा सुधारेल आणि काही दिवसात रंगही उजळेल. 
     

संबंधित बातम्या