Healthy Tips: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'या' पोषक पदार्थांचे करावे सेवन

रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी पोषक घटकांचे सेवन करणे आवश्यक आहे.
Healthy Tips: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'या' पोषक पदार्थांचे करावे सेवन
Immunity Booster Food Dainik Gomantak

कोरोना (Corona) काळात स्वता: ला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्वे आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थनचे सेवन करावे. रोगप्रतीकारशक्ती (Immunity) मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि झिंक सर्वात महत्वाचे आहेत. विविध संसर्गापासून बचाव करण्यासाठी विवध पोषक घटकांचे सेवन करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेवूया कोणती आहेत ही पदार्थ.

* व्हिटॅमिन 'सी' ने समृद्ध असलेले पदार्थ

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. फळांमध्ये (Fruits) तुम्ही किवी, संत्री, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी आणि अननस ही फळे खावू शकता तर भाज्यांमध्ये ब्रोकोली, लिंबू, बटाटा आणि टोमॅटोमधून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळू शकते.

Immunity Booster Food
Pregnancy Care: पपई खाल्ल्याने होऊ शकते गर्भपात

* व्हिटॅमिन 'डी' ने समृद्ध असलेले पदार्थ

व्हिटॅमिनचा सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश होय. दररोज सकाळी सुमारे 15 मिनिटे सकाळी सूर्यप्रकाश घ्यावा. याशिवाय अंडी, मशरूम, दही, मासे आणि संत्री व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता भरून काढतात.

* झिंकयुक्त पदार्थ

बहुतेक लोक झिंकची कमतरता पूर्ण करण्यासाठी औषधे घेतात. पण काजू, अंडी, शेंगदाणे, तीळ, टरबूज आणि सोयाबीनचे सेवन केल्यास शरीरातील झिंकची कमतरता भरून येते. झिंकमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.