
थंडीचे दिवस हे आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे असतात. थंडीच्या दिवसात आपली पचनक्रिया काहीशी मंदावलेली असते. त्यामुळे खाण्याकडे, दोन वेळेच्या जेवणाकडे प्रत्येकाने लक्ष ठेवणे गरजेचे असते. आहारात कोणते पदार्थ घ्यावेत हे एकदा समजले कि आपण आपली प्रकृती उत्तम ठेऊ शकतो. थंडीच्या या दिवसात अशी काही सूप आहेत ज्यांचे सेवन केले पचनक्रिया सुधारतेय सोबत आपण आपले वजन कमी करू शकतो.
टोमॅटोचे सूप :
थंडीच्या दिवसात टोमॅटोचे सूप तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी टोमॅटोचे सूप तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. टोमॅटोमध्येही कॅलरीज आणि फॅट खूप कमी प्रमाणात असते, त्याशिवाय बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी यासह इतर अनेक पोषक घटक असतात. तसेच टोमॅटो सूप चविष्ट लागते त्यामुळे घरातील सर्वजण आवडीने पितात.
भाज्यांचे सूप :
टोमॅटोचे सूप करण्यासोबतच जर सर्व भाज्या एकत्र करून भाज्यांचे सूप केले तर ते फायदेशीर ठरते. कारण सर्व भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, भाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या आरोग्यदायी भाज्यांचे सूप तयार करून प्यावे.
मशरूम सूप :
हल्ली सर्रास घरातून मशरूमची भाजी केली जाते. मशरूम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ज्या प्रकारे मशरूमची भाजी जितकी स्वादिष्ट असते तितकेच मशरूमचे सूप जास्त स्वादिष्ट असते. हे सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मशरूममध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. इतरही बरेच पोषक घटक असल्यामुळे वजन झपाट्याने कमी होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.