Health Tips: घशात खवखव होत असल्यास करा 5 घरगुती उपाय

Home Remedies: बदलत्या ऋतूमध्ये घसा खवखवणे अनेकांना ही समस्या जाणवते.
Health Tips|Home Remedies
Health Tips|Home RemediesDainik Gomantak

बदलत्या ऋतुमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज किंवा खवखव जाणवते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. तुम्हालाही अशी समस्या जास्त असेल तर नेहमी औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. (Home Remedies throat infection news)

* मिठाच्या पाण्याने गुरळ्या करणे

घसा (Throat) दुखणे, सूजणे किंवा दुखणे .या समस्या दुर करण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुरळ्या कराव्या. यामुळे घशाला आराम मिळतो.

* कोमट पाणी

घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याने घशाचा त्रास वाढु शकतो. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग (Virus) हळूहळू कमी होतो. तुम्ही पाण्यात थोडी हळद देखिल टाकू शकता.

* मध

घशामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दी दुर ठेवतात.

Health Tips|Home Remedies
Dating Tips: पुरूषांनी पहिल्या डेटमध्ये 'या' गोष्टींची घ्या काळजी

* हळदीचे दूध

घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री झोपतांना हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात.

* आलं खावे

खवखवण किंवा सर्दी खोकला झाल्यास आल्याचा वापर करावा. आल्यामध्ये औषधीयुक्त गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळुन घ्यावा आणि 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com