पावसाळ्यात बीचवर फिरायला जाताना घ्या काळजी

Monsoon Tips: मान्सूनने दिमाखात गोव्यात प्रवेश केला आहे
पावसाळ्यात बीचवर फिरायला जाताना घ्या काळजी
Tips before go on beach in monsoon Dainik Gomantak

मान्सूनने दिमाखात गोव्यात (Goa) प्रवेश केला आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना समुद्रबंदी कधीच लागू झाली आहे. सध्याची हवामान स्थिती लक्षात घेता सर्व किनार्‍यांवर ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दृष्टीच्या देखरेखीखाली असणारी ही सारी क्षेत्रे ‘नो स्वीम झोन’ म्हणून जाहीर झाली आहेत. (tips before go on beach in monsoon News)

‘दृष्टी मरिन’चे प्रमुख संचालक नवीन अवस्थी इशारा देत म्हणतात, ‘समुद्राच्या पाण्यात या दिवसात पोहायला जाणे हे धोकादायक तर आहेच पण अशा मोसमातल्या खवळलेल्या समुद्रात नुसते पाण्यात उतरणेही कमी धोकादायक नसते. पाण्यात न उतरण्याचा सल्लाच आम्ही देऊ. अर्थात आमचे 400 सुरक्षा रक्षक पावसाळी हवामानात किनाऱ्यांवर नजर ठेवून असतीलच. या सुरक्षारक्षकांच्या पथकाला कठीण हवामानाला तोंड देत पाण्यात अडकलेल्यांची सुटका कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.’ किनाऱ्यांना (Beach) भेट देणार्‍यांना समुद्रातला खडकाळ भाग व उंचवटे टाळण्याचा सल्ला ‘दृष्टी’ने ‘दिला आहे. पावसाळ्यात (Monsoon) हे भाग धोकादायकपणे निसरडे बनलेले असतात. लाटांची उंची, तीव्रता यामुळे पाण्यात शिरणारा, उग्र बनलेल्या समुद्रात सहजपणे खेचला जाऊ शकतो. ‘दृष्टी’ नियमितपणे समुद्राची स्थिती आणि हवामानाचे निरीक्षण करत असते.

* समुद्राच्या पाण्यात शिरू नका. पाण्यात खेळणे जोखमीचे राहील.

* समुद्र किनाऱ्यांना भेट देणार्‍यांनी समुद्ररेषेपासून किमान दहा मीटरचे अंतर राखणे महत्त्वाचे आहे.

* सुरक्षारक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

* पाणी कितीही उथळ भासले तरी लहान मुलांना पाण्यात उतरू देऊ नका. किनाऱ्यावर असेपर्यंत बरोबरच्या मुलांवर नीट लक्ष असू द्या.

* वीज चमकत असताना पाण्यात उतरणे वा पाण्याजवळ जाणे जोखमीचे असते कारण वीज आपल्याला धोका निर्माण करू शकते.

Tips before go on beach in monsoon
Travel Tips: प्रवासात असुद्या 'हे' 5 हॉलिडे स्नॅक्स

* सुट्टीच्या वेळेस किनाऱ्यावरच्या खडकांवर जाऊ नका. पावसाळ्यात या खडकांवर शेवाळ दाटून ते अधिक निसरडे बनलेले असते.

* जून ते सप्टेंबरपर्यंतच्या काळात समुद्र जरी शांत वाटत असला तरी अचानक मोठी लाट अंगावर येऊन खोल पाण्यात खेचुन घेऊ शकते.

* मद्यपान केले असेल तर पाण्यात उतरणे टाळाच. ते अधिकच धोकादायक असते.

* किनाऱ्यावर (Beach) प्रवेश करत असताना तिथे लिहिलेल्या सुरक्षा सूचनांचे आणि चिन्हांचे पालन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com