आज गोव्याचे पाणमांजर ‘वाइल्ड यू वेअर स्लीपिंग'मध्ये

‘वसुंधरा दिना’निमित्त सहा भागांची डॉक्युसिरिज वाइल्ड यू वेअर स्लीपिंग लाँच केली आहे.
Otter
OtterDainik Gomantak

गोवा: भारतातील कमी ज्ञात असलेल्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, द हॅबिटॅट्स ट्रस्टने, ‘वसुंधरा दिना’निमित्त सहा भागांची डॉक्युसिरिज ‘वाइल्ड यू वेअर स्लीपिंग’ लाँच केली आहे. या मालिकेत भारतातील काही सर्वात आकर्षक वन्य प्रजातींच्या कथा दाखवण्यात येणार आहेत, ज्या मानवी वस्तीजवळ राहतात, परंतु लोकांना ज्ञात नाहीत व ज्यामुळे अनेकदा अवघड परिस्थिती निर्माण होते. माहितीपटामध्ये प्रत्येक प्रजातीवर चित्रित केलेले 7 ते 9 मिनिटांचे छोटे भाग दाखवले जाणार आहेत. यापैकी एका भागामध्ये मूळतः गोव्यातील नदी-खाडींमध्ये राहणाऱ्या लाजाळू, मायावी, मऊ त्वचा असणाऱ्या पाणमांजरांची कहाणी आहे. कुत्र्यांच्या उपस्थितीमुळे आणि त्या राहत असलेल्या प्रदेशातील मच्छीमार-लोकांकडून अधूनमधून निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे या पाणमांजरींना धोका निर्माण झाला आहे.

Otter
झुआरी ॲग्रो लिमिटेड मधील ते बळी कुणाचे?

गोव्यातील पाणमांजरींसंबंधात असलेला हा भाग, आज, 6 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ची वेबसाइट तसेच सोशल मीडिया चॅनेल (फेसबुक, युट्युब आणि इंस्टाग्राम)वरून प्रसारित केला जाणार आहे. या मालिकेची सहनिर्मिती आघाडीची डॉक्युमेंट्री फिल्म कंपनी ‘ट्रिपिंटो मीडिया’ने केली आहे.

द हॅबिटॅट्स ट्रस्ट भारतातील कमी ज्ञात प्रजातींना चर्चेत आणण्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वाला असणाऱ्या आव्हानांकडे आणि धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कार्य करत आहे. ‘वाइल्ड यू वर स्लीपिंग’, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या सहा प्रजातींच्या जीवनाबद्दल, साध्या परंतु सर्जनशील स्वरूपात माहिती देतील, ज्यामुळे प्राण्यांबद्दल केवळ सहानुभूतीच निर्माण होणार नाही, तर सामान्य लोकांमध्ये एक संवर्धनवादी नैतिकतादेखील वाढेल.

Otter
फूड ट्रक आणि तृप्तता...

आज भारतातील बहुतांश संवर्धनाचे लक्ष आणि प्रयत्न आपल्या जंगलात वस्ती करणाऱ्या निवडक आणि आकर्षक प्रजातींवर केंद्रित आहे. नागरी प्रदेशात असणाऱ्या अनेक प्रजातींकडे आणि आपल्या काही कृतींमुळे (किंवा काही कृती न केल्यामुळे) त्यांच्या अस्तित्वाला कसा धोका निर्माण होऊ शकतो याकडे आपले क्वचितच लक्ष जाते. या प्रजाती पर्यावरण आणि अन्न साखळीमध्ये संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची झपाट्याने कमी होत असलेली संख्या पर्यावरणामध्ये पूर्णपणे असंतुलन घडवून आणत आहे. ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ अनेक प्रजातींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याचा आणि त्यांच्या अस्तित्वावर धोका निर्माण करणाऱ्या घटकांना जाणून घेण्याच्या दिशेने काम करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com