आज, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्त्व दिन; वाचा काय आहे हे दिवसाचे महत्त्व 

दैनिक गोमंतक
रविवार, 11 एप्रिल 2021

महिलांच्या सुरक्षित मातृत्त्वासाठी देशात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. व्हाईट रिबन अलायन्स इंडियाचा (डब्ल्यूआरएआय) हा एक उपक्रम आहे. सुरक्षित मातृत्वासाठी केंद्रसरकारने 2003 मध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

महिलांच्या सुरक्षित मातृत्त्वासाठी देशात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. व्हाईट रिबन अलायन्स इंडियाचा (डब्ल्यूआरएआय) हा एक उपक्रम आहे. सुरक्षित मातृत्वासाठी केंद्रसरकारने 2003 मध्ये 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. बाळंतपणामुळे मातांच्या मृत्यूच्या बाबतीत भारतातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीवेळी आणि प्रसूतीनंतर जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळावी, जेणेकरून कोणत्याही महिलेचा प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीमुळे मृत्यू होऊ नये, हा या उपक्रमामागचा हेतु आहे. (Today, Safe Motherhood Day; Read what is the significance of the day) 

आपल्या रोग प्रतिकारशक्तीचे शत्रू आताच किचनमधून बाहेर काढा

भारतात 12 टक्के मातृ मृत्यु दर
भारतात दरवर्षी सुमारे 45000 महिला प्रसूती दरम्यान आपला जीव गमावतात. ही संख्या जगभरातील मृत्यूंपैकी 12 टक्के आहे. देशात जन्म देताना प्रत्येक  1 लाख महिलांपैकी 167 महिलांचा मृत्यू होतो.  परंतु आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, भारतात मातृ मृत्यु दर झपाट्याने कमी होत आहे. 1990  ते 2011-13 याकाळात या कालावधीत जागतिक पातळीवर माता मृत्यूच्या प्रमाणात 67 टक्के कमी करण्यात देशाला यश आले आहे.

Summer Health Tips: उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी जरूर प्या सत्तूचं सरबत

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचे महत्त्व 2021
कोविड साथीच्या आजारामुळे जगभरात आरोग्य आणीबाणी आहे. अशा परिस्थितीत देशातील प्रत्येक गर्भवती महिलेची काळजी घेणे आवश्यक आहे. या वातावरणात, सरकारने गर्भधारणेपूर्वी आणि नंतर महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लागण झाली आहे. त्या महिलांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळण्याचा आधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांना कोणतेही कारण न देता घराबाहेर न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Covid-19 Prevention Google Doodle: गूगलने डूडल बनवून सांगितले कोरोना...

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचा इतिहास
1800 संघटनांच्या समूहाच्या व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (डब्ल्यूआरएआय) च्या विनंतीनुसार भारत सरकारने 2003 मध्ये ११ एप्रिलला कस्तूरबा गांधी यांची जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून घोषित केला.  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन अधिकृतपणे जाहीर करणारा भारत जगातील पहिला देश आहे. या दिवशी देशभरातील गर्भवती महिलांच्या पोषणाकडे योग्य लक्ष देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

संबंधित बातम्या