
Summer Beauty Tips: अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का की टोमॅटो केवळ तुमच्या जेवणाची चवच वाढवत नाही तर ते तुमच्या त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे.
टोमॅटो हे पोषक तत्वांचे भांडार आहे. जे तुमच्या केस आणि त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टोमॅटोचे असे फायदे सांगणार आहो.
ज्याबद्दल तुम्हाला अजूनही माहिती नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी बाजारातील केमिकल प्रोडक्टसची गरज भासणार नाही. तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये टोमॅटोचा वापर केल्यास अनेक फायदे मिळतील.
असा करावा टोमॅटोचा वापर
1. टोमॅटो फेस मास्क
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. जो एक प्रकारचा अँटिऑक्सिडेंट आहे. जो सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतो. टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.
टोमॅटो फेस मास्क कसा बनवायचा?
फेस मास्क बनवण्यासाठी एक पिकलेला टोमॅटो एक चमचा मधात मिसळा आणि मिश्रण तयार करावा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवावे.
2. टोमॅटोचा टोनर
टोमॅटोचा रस तेलकट आणि मुरुम असलेल्या त्वचेसाठी उत्कृष्ट टोनर म्हणून काम करतो. हे त्वचेवर तेलाचे उत्पादन नियंत्रित करते आणि चेहऱ्यावरील छिद्रे उघडण्यास मदत करते.
टोमॅटोचा टोनर कसा बनवायचा?
टोनर बनवण्यासाठी तुम्हाला फक्त टोमॅटोचा रस आणि विच हेजेल एकत्र मिक्स करावे लागेल. हे मिक्स केल्यानंतर कापसाने चेहऱ्याला लावा.
3. टोमॅटो हेअर मास्क
टोमॅटो हे जीवनसत्त्व अ आणि क चे भांडार आहे. हे जीवनसत्त्वे केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करतात आणि केसांच्या वाढीसही मदत करतात.
टोमॅटो हेअर मास्क कसा बनवायचा?
एक पिकलेला टोमॅटो एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करावा. तुमचा हेअर मास्क तयार आहे. शैम्पूने केस धुण्यापूर्वी 30 मिनिटे तसेच राहू द्या.
4. टोमॅटो लिप स्क्रब
टोमॅटोचा वापर ओठांना मॉइश्चरायझिंग आणि एक्सफोलिएटिंगसह अनेक कारणांसाठी केला जातो. याच्या लिप स्क्रबमुळे तुमचे ओठ चमकतात.
टोमॅटो लिप स्क्रब कसा बनवायचा?
लिप स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा टोमॅटोची पेस्ट, एक चमचा ब्राऊन शुगर आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुमच्या ओठांवर वर्तुळाकार गतीने चोळा आणि काही वेळाने तुमचे ओठ कोमट पाण्याने धुवावे.
5. डोळासाठी फायदेशीर
डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी टोमॅटो उपयुक्त ठरू शकतो.
कसे करावे?
टोमॅटोने डोळ्यांवर उपचार करण्यासाठी एक चमचा टोमॅटोच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.