गोवा होतंय परत 'ऑन' ....

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

गोवा राज्य हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे एक केंद्र आहे. येथील पर्यटनाने राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असून बरेच व्यवसायही पर्यटनाला पुरक असल्याने कोरोनाकाळात राज्यात मोठी बेरोजगारी वाढली होती.

पणजी- देशाची अर्थव्यवस्था सध्या नाजूक परिस्थितीत आहे. लॉकडाउनच्या काळात सगळे व्यवसाय, व्यापार, आयात-निर्यात बंद असल्याने महसूलाचा मार्गच बंद झाला होता. सध्या देशात अनलॉकचा 5वा टप्पा सुरू झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या प्रक्रियेत राज्य सरकार महसूलासाठी विविध मार्ग शोधत आहे.

गोवा राज्य हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे एक केंद्र आहे. येथील पर्यटनाने राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून असून बरेच व्यवसायही पर्यटनाला पुरक असल्याने कोरोनाकाळात राज्यात मोठी बेरोजगारी वाढली होती. जुलैमहिन्यात गोव्यातील पर्यटनाला परवानगी मिळाल्याने राज्याची स्थिती आता  पुर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

परंतु, परदेशी नागरिकांना मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विदेशातील पर्यटकांना सध्यातरी गोव्यात येता येणार नाही. देशातून जे पर्यटक येतील त्यांच्या सोयीसाठी गोव्यातील 250 हॉटेल्सही आता पूर्ववत झाल्या असून लवकरच येथे वर्दळ पाहायला मिळेल.  

 

संबंधित बातम्या