Goa Travel Tips: गोव्याला फिरायचा प्लॅन करताय? बीच सोडून 'या' गोष्टीही पाहाच

गोव्याला जातांना तुम्ही पण या चुका करता?
Goa Travel Tips: गोव्याला फिरायचा प्लॅन करताय? बीच सोडून 'या' गोष्टीही पाहाच
Goa Travel Tips| Goa Dainik Gomantak
Goa Beach
Goa BeachDainik Gomantak

गोवा म्हटले की डोळ्यासमोर येतात समुद्रकिनारे! पण गोवा केवळ समुद्रकिनाऱ्यासाठीच प्रसिद्ध नसून येथे अनेक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गोव्यात अंजुना, बागा, पालोलेम, कलंगुट आणि इतर अनेक लोकप्रिय बीच आहेत. पण गोव्याला एक सुंदर ग्रामीण भाग, प्राचीन किल्ले आणि चर्च, संग्रहालये, गुहा आणि पोर्तुगीज वास्तुकलेची काही विलक्षण वास्तू आहेत. जर तुम्ही गोव्याची ही बाजू पाहिली नसेल तर तुम्ही खरोखरच थोडाच गोवा पहिला आहे. भाड्याने मिळणारी दूरचाकी घ्या आणि गोवाला एक्सप्लोर करा. (Goa is more than beaches)

Goan Food
Goan FoodDainik Gomantak

तुम्हाला तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील, तर रास ऑम्लेट, प्रॉन करी, भात-मासे,चोरीस पाव, सोरपोतेल,बोडाभजी,बीफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉप,कटलेट्स यासारख्या अनेक गोवण पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

cashless  payment
cashless payment Dainik Gomantak

गोव्याला जातांना तुम्हाला रोख रक्कम घेऊन जाणे आवश्यक आहे. गोव्यातील फ्ली मार्केटमधील अनेक दुकानामध्ये कार्ड स्वीकारले जात नाही. तुम्हाला लहान रेस्टॉरंट्स, बीच शॅक्स, भाड्याने दुचाकी घ्यायची असले तर रोख पैसे द्यावे लागतील. अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंट देखील स्वीकारल्या जाते.

garbage
garbageDainik Gomantak

आज गोव्यात फक्त काही समुद्रकिनारे उरले आहेत ज्यात स्वच्छ पाणी आहे. पर्यटकांनी हे विसरतात की गोवा हे लोकांचे घर आहे जे वर्षभर आपले स्वागत करतात. गोव्याच्या बीचवर आनंद लुटताना कचरा होणार नाही यांची काळजी घ्यावी.

wrong season
wrong seasonDainik Gomantak

गोव्याला जाताना योग्य ऋतुची निवड करावी. गोव्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ऑफ सीझनमध्ये जाऊ शकता. गोव्यात तुम्ही हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आनंद घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.