रोजमेरी ऑइल केसांच्या वाढीसाठी गुणकारी

केसांना नियमितपणे रोजमेरी ऑइल (Rosemary Oil) लावल्यास केसांची योग्य वाढ होण्यास मदत मिळते.
रोजमेरी ऑइल केसांच्या वाढीसाठी गुणकारी
Tremendous benefits Rosemary Oil for hair growthDainik Gomantak

रोजमेरी (Rosemary) हे एक औषधीयुक्त वनस्पती आहे. अनेक विदेशी लोक यांचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी करतात. शिवाय रोजमेरी तेलाचा (Rosemary Oil) वापर अरोमाथेरपीसाठी देखील केला जातो. याचे तेल केसांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. रोजमेरी तेलाच्या वापरामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. तसेच केसांच्या अनेक समस्या या तेलाच्या वापरामुळे कमी होतात. चला तर मग जाणून घेवूया रोजमेरी तेलाचा (Rosemary Oil) कसा वापर केला जातो.

* पुढील पद्धतींचा करावा वापर

1) शॅम्पूमध्ये रोजमेरी तेल मिक्स करावे

आपण जो नियमित शॅम्पू वापरतो त्यात रोजमेरी या तेलाचे (Rosemary Oil) 5 ते 6 थेंब टाकावे. या तेलाचे केसांच्या मुळात काजी मिनिटे मसाज करावी. नंतर 5 ते 8 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास केसांचे आरोग्य निरोग राहून केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

2) रोजमेरी ऑईलने केस धुवावे

एका मोठ्या मग मध्ये पाणी घ्यावे. त्यात 3 ते 4 थेंब रोजमेरी तेल (Rosemary Oil) मिक्स करावे. आपल्या केसांना नेहमी प्रमाणे शॅम्पू करावे. यांनंतर रोजमेरी पाण्याने केस स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास केस मुलायम होऊन दाट होण्यास मदत मिळते.

 Tremendous benefits  Rosemary Oil  for hair growth
Hair Care Tips: मुलायम केसांसाठी मिनिटांमध्ये घरीच बनवा Hair Gel

3) रोजमेरी ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल

एका मोठ्या वाटीमध्ये 2 ते 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घ्यावे. त्यात रोजमेरी तेलाचे(Rosemary Oil) 4-5 थेंब घालावे. यांचे मिश्रण केसांच्या मुळात चांगले लावावे. 10 ते 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून 2-3 वेळा केल्यास केसांचे गळणे कमी होते.

4) रोजमेरी ऑइल आणि कोरफड

एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे कोरफड जेल आणि 4 थेंब रोजमेरी ऑइल मिक्स करावे. याचे मिश्रण केसांच्या मुळात लावून मसाज करावी. 10 ते 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून 2-3 वेळा रोजमेरी ऑइल (Rosemary Oil) लावल्यास केसांच्या समस्या दूर होऊन केसांची वाढ होण्यास मदत करते.

Related Stories

No stories found.