
जीवनात करिअर किंवा व्यावसायात (Career and Business) चांगले यश मिळावे असे कुणाला वाटतं नाही? पण, अनेक संकटे आणि समस्या यामुळे मनुष्य व्यथित होतो. तेव्हा सतत प्रयत्न आणि काही उपाय सुरू ठेवल्यास आयुष्यात कुठल्याच गोष्टीत अपयश येणार नाही. मात्र, उपाय करत असताना तुमचे प्रयत्न कधीच सोडू नका.
भीती आणि असुरक्षितता (Fear and insecurity) हे दोन कोणत्याही व्यक्तीचे सर्वात मोठे शत्रू असतात. या दोन भावना लोकांची उत्पादकता आणि आनंद यावर नियंत्रण ठेवतात. तुम्ही सकारात्मक असल्यास अनेक गोष्टी प्राप्त करू शकता आणि यश मुळवू शकता.
१) सकाळी उठल्याबरोबर हाताचे दोन्ही तळवे पसरून, चेहऱ्यासमोर घ्या आणि त्याकडे पहा. असे केल्याने धन प्राप्ती होते अशी मान्यता आहे.
असे मानले जाते की, तुमच्या बोटांवर लक्ष्मी वास करते, तळहाताच्या मध्यभागी सरस्वती आणि तळहाताच्या तळाशी श्रीगणेश वास करतात. तुमच्या तळहाताकडे पाहून तीन देवी-देवतांचा आशिर्वाद तुम्हाला मिळतो. तळहात पाहून खालील श्लोक म्हणा:
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।
कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥
२) जीवनात यश मिळवण्यासाठी सर्वात शक्तिशाली दोन मंत्र आहेत. ते म्हणजे गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र. (Gayatri Mantra And mahamrityunjay Mantra) गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा दररोज 31 वेळा जप करा आणि गायत्री देवी व भगवान शिव शंकराचा आशिर्वाद मिळवा.
३) तांब्याच्या भांड्यात गूळ घेऊन सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. सूर्योदयानंतर एक तासाच्या आत अर्घ्य द्यावे. जल अर्पण करताना 11 वेळा 'ओम हि सूर्याय नमः' हा जप करा.
४) शनिवारी उकडलेले तांदूळ कावळ्यांना खाऊ घाला. कावळा शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रात, शनी करिअरवर राज्य करतो. कावळ्यांना खायला दिल्याने शनि शांत होतो. असे मानले जाते.
५) श्रीगणेशाला विघ्ननाशक म्हटले जाते. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्हाला त्यांच्या बीज मंत्राचा फायदा होईल. ऊं गण गणपतये नम: हा मंत्राचा उच्चार कारा.
६) व्यावसायात यशासाठी एक लिंबू घ्या आणि त्याचे 4 काप करा. उजव्या हातात घ्या आणि पूर्ण भक्तिभावाने 21 वेळा ओम श्री हनुमंते नमः चा जप करा. जप पूर्ण झाल्यावर लिंबू तुमच्या खिशात किंवा पर्स मध्ये ठेवून द्या.
७) यशस्वी करिअरसाठी दररोज सूर्यनमस्कार करा आणि रविवारी सूर्याची पूजा करा, अशा व्यक्तीला विशेष कृपा प्राप्त होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.