Remedies For Beautiful Wife: मनासारखी पत्नी मिळवायची असेल तर या टीप्स करा फॉलो

Tips For Beautiful Wife: पण काहीजण सुंदर पत्नी मिळवण्यासाठी देवी-देवतांची पूजा करतात.
Wife
WifeDainik Gomantak

Astro Upay: प्रत्येक व्यक्तीला आपला जीवनसाथी योग्य आणि सुंदर असावा असे नेहमी वाटते. परंतु अनेक वेळा माणसांचे ग्रह फिरतात आणि त्याच्या इच्छा अपूर्णच राहतात. परंतु काही महाभाग सुंदर पत्नी मिळवण्यासाठी देवी-देवतांची पूजाही करतात. दुसरीकडे, काही लोक इतके भाग्यवान असतात की काहीही न करता त्यांना देवाच्या कृपेने लक्ष्मीच्या रुपात पत्नी मिळते.

दरम्यान, ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या लोकांचा जन्म ज्येष्ठ नक्षत्रात होतो, ते खूप भाग्यवान असतात. अनेक वेळा व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात पण परस्पर वादामुळे त्या व्यक्तीची सुख आणि शांती हिरावून घेतली जाते. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा ज्योतिषीय उपायांबद्दल ज्याद्वारे व्यक्तीला सुंदर पत्नी मिळेल. तसेच वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील.

Wife
Palmistry : हातावरील ही 7 चिन्हे उघडतात नशिबाचे कुलूप; जाणून घ्या हातावरील खुणांचा योग्य अर्थ

दुसरीकडे, 27 नक्षत्रांपैकी ज्येष्ठ नक्षत्राचे स्थान 23 वे आहे. असे म्हणतात की, या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने शांत असतात. धर्म आणि कर्मावर त्यांची खूप श्रद्धा असते. या नक्षत्रातील लोक भावनिकही असतात. एवढेच नाही तर हे लोक आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतात. या लोकांना सुंदर पत्नी मिळवायची असेल तर भगवान शिवाची पूजा फलदायी ठरते. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. तसेच 16 सोमवारी व्रत ठेवल्याने सुंदर जोडीदार मिळतो, असे सांगितले जाते. ज्योतिष शास्त्रात पुढे असेही सांगितले आहे की, दररोज सूर्यदेवाला कणेरचे फूल अर्पण केल्याने देखील सुंदर पत्नी मिळते.

Wife
Palmistry: हातावरील 'या' रेषा भविष्यात होणार्‍या आजारांबद्दल देतात संकेत

शिवाय, जर कोणत्याही पुरुषाला सुंदर आणि सुसंस्कृत पत्नी हवी असेल तर दुर्गा सप्तशती मंत्राचा जप करावा. मंत्र आहे की, पत्नी (Wife) मनोमा देहि मनोवृत्कारिणीम् । तारिणी दुर्गासंसारसागरस्य कुलोद्वम् । या मंत्राचा जप केल्याने सुंदर आणि सुशील मुलीचे लग्न होते, असे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com