Vastu Tips: घरात काटेदार झाडे लावल्यास उद्भवू शकतात आर्थिक समस्या

वास्तुशास्त्रानुसार, (Vastushashtra) अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने तणाव निर्माण होऊ शकते.
Vastu Tips: घरात काटेदार झाडे लावल्यास 
उद्भवू शकतात आर्थिक समस्या
If you plant these trees at home Financial problems can ariseDainik Gomantak

आजकाल बहुतेक लोक आपल्या घरात झाडे लावतात. यामुळे केवळ पर्यावरण शुद्ध होत नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील येते. पण वास्तुशास्त्रानुसार, (Vastushashtra) अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्याने तणाव निर्माण होऊ शकते. या झाडांमुळे घरात आर्थिक समस्या (Financial problems) निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेवूया या झाडांबद्दल.

* घरात काटेरी झाडे लावण्याचे तोटे

  • घरात किंवा घराच्या गार्डनमध्ये कॅक्टससारखी काटेरी झाडे लावू नये.

  • घरात काटेरी झाडे लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • काटेरी झाडे लावल्याने घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते.

  • गुलाबचे झाड सोडून इतर काटेरी झाडे घरात लावू नये.

* पिंपळचे झाड लावू नये

पिंपळाचे झाड लावने घरात अशुभ मानले जाते. तसेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने घरात पिंपळाचे झाड लावू नये.

* घरात ही झाडे लावावी

* अशोकाचे झाड फायदेशीर

घराबाहेर अशोकाचे झाड लावल्याने कुटुंबांमध्ये सुखशांती राहते. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी राहते.

If you plant these trees at home
Financial problems can arise
Vastu Tips: चपाती बनवण्याच्या तव्याचा वास्तूशीही आहे विशेष संबंध, जाणून घ्या

* तुळशीचे झाड शुभ मानले जाते

बहुतेक लोक आपल्या घरात ही वनस्पती लावतात. ही वनस्पती हिंदू धर्मात आदरणीय मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार या वनस्पतीला घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. परंतु या वनस्पतीच्या देखभालीसाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की ही वनस्पती ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावी. ही वनस्पती घराच्या अंगणात ठेवता येते. या झाडाजवळ काटेरी झाडे कधीही लावू नका. तुळशीच्या रोपावर संध्याकाळी दिवा लावावा. असे मानले जाते की असे केल्याने आई लक्ष्मीची कृपा कायम राहते. या रोपाभोवती स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्यावी.

* मनी प्लांट लावावे

वास्तुनुसार, ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की ते घरात लावल्याने आर्थिक संकट दूर होते. ही वनस्पती जितकी हिरवी असेल तितकी चांगली. हे मां लक्ष्मीचे रूप मानले जाते. हे नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com