Valentine's Day 2021 : तुम्ही वाचायलाच हव्यात अशा न ऐकलेल्या या अनोख्या प्रेमकहाण्या

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

‘व्हॅलेंटाईनस डे’ एकमेकांप्रती हेच प्रेम, जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीचे काय महत्त्व आहे हे सांगण्याचा दिवस.

तुजवाचुनी मज आयुष्य हे आताशा अर्थहीन भासे,का कळेना मज कसे कधी हे हृदय गुंतले,प्रेम प्रेमच की हे वेड हे कळेना कसे,सख्या रे का वेड लाविले असे?

- नीता महाजन

आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यावर छाप टाकत असते. प्रत्येक नात्यांमधील बंध हा निराळा असतो. आई, वडिल, बहिण, भाऊ, मित्र, मैत्रिण प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात वेगळे महत्त्व असते. प्रत्येक नात्यात प्रेम उपजतेच असे नाही. पण, जिथे उपजते तिथे ते दीर्घकाळ टिकविण्याचा प्रत्येकाने प्रयत्न जरूर करायला हवा. ‘व्हॅलेंटाईनस डे’ एकमेकांप्रती हेच प्रेम, जिव्हाळा, आदर व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीचे काय महत्त्व आहे हे सांगण्याचा दिवस. आपल्या आजूबाजूला अशा अनेक लव स्टोरीज् आहेत,ज्यांची स्टोरी काहीतरी हटके आणि इतरांना प्रेरणा देणारी असते. काहीं लव स्टोरीज् आपल्यापर्यंत पोहोचतात, तर काही गुलदस्त्यातच राहतात. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त जाणून घेऊ अशाच काही प्रेमकथा ज्या निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.

1. शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी

विराट-अनुष्काची प्रेमकहाणी तक सर्वांनाच तोंडपाठ आहे. पण टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनची प्रेमकहाणी जरा हटके आहे. शिखर धवनची पत्नी आयेशाचे वडील भारतीय असून, आई इंग्रजी वंशाची असल्याने आयशा अँग्लो-इंडियन आहे. तिचा जन्म भारतात झाला होता, परंतु लवकरच तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले. ती एक प्रशिक्षित किकबॉक्सर आहे. आयशा बंगाली आणि इंग्रजी भाषेत अस्खलित आहे. तिचे आधी एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी लग्न झाले होते पण घटस्फोट झाला.

क्रिकेटपटू हरभजन सिंग फेसबुकवर शिखर आणि आयशा यांचा म्युच्युअल फ्रेंड होता. शिखरने आयशाचे प्रोफाईल बघताच त्याला ती आवडली. त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जी तिने स्वीकारली. फेसबुकवर झालेल्या संभाषणांमुळे त्यांच्यात मैत्री झाली. 2009 मध्ये या जोडप्याने साखरपुडा केला., पण लग्नाची गाठ बांधण्यापूर्वी शिखरने थोडा वेळ थांबण्याचा आग्रह धरला. त्याला प्रथम भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी क्रिकेटर म्हणून स्थापित व्हायचे होते. अखेर या जोडप्याने 2021 मध्ये पारंपारिक शीख पद्धतीने लग्न केले. आयशा शिखरपेक्षा जवळपास दहा वर्षांनी मोठी आहे आणि तिला लग्नाआधी दोन मुलीही होत्या. शिखर धवनच्या या लग्नावर बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण, शिखर धवनच्या आईने त्याला खूप आधार दिला. 2014 मध्ये आयशा व शिखरने जोरावर नावाच्या गोंडस मुलाला जन्म दिला.

2. सचिन पायलट व सारा अब्दुल्लाह

सचिन आणि साराची अतिशय फिल्मी प्रेमकहाणी आहे. सचिन आणि सारा दोघेही राजकीयदृष्ट्या वरचढ कुटुंबातील आहेत सचिन पायलट हे माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते असलेले कै. राजेश पायलट यांचा मुलगा आहे. सारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची बहीण आहेत. लंडनमध्ये सारा आणि सचिन पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. सचिनचे वडील आणि साराचे वडील दोघेही जवळचे मित्र होते आणि म्हणूनच त्यांना यापूर्वी कधीच भेट झाली नसली, तरी एकमेकांच्या कुटुंबाविषयी माहिती होती. सचिन एमबीए करत होते.सारा आणि सचिनच्या मित्रांमुळे त्यांच्यातदेखील मैत्री झाली. काळानुसार त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली आणि प्रेमामध्ये रूपांतरीत झाली.

3. सोनिया गांधी व राजीव गांधी

राजीव गांधी हे उच्चशिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले होते. राजीव गांधी व सोनिया गांधी प्रथम केंब्रिज विद्यापीठाच्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये भेटले होते, तिथेच ते एकमेकांना पसंत पडले. राजीन गांधी सोनिया गांधीना 'माझ्या बघितलेली सर्वात सुंदर स्त्री' असे म्हणत.

4. मनमोहन सिंग व गुरशरण कौर

मनमोहन सिंग यांचे खासगी आयुष्य, तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील आवडीडनिवडींबाबतदेखील कोणाला फारशी माहिती नाही. डॉ. मनमोहन सिंग यांचे आपला जोडीदार कसा असेल, याबाबत काही विशिष्ट विचार होते.त्यांच्यासाठी आपल्या जोडीदाराचे शिक्षण अत्यंत महत्तवाचे होते. आपला जोडीदाराने चांगले शिक्षण घेतलेले असावे, असे त्यांना वाटायचे. गुरूशरण यांना BA ची पदवी प्राप्त केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांनी तुम्हाला BAच्या परीक्षेत कोणती डिव्हीजन प्राप्त झाली अशी विचारणी केली होती.’सेकंड क्लास’ हे उत्तर ऐकूनदेखील त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी गुरशरण यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची चौकशी केली होती. ही माहिती घतल्यानंतरच ते लग्नासाठी तयार झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांचा साखरपुडा होईपर्यंत त्यांनी एकमेकांना बघितले देखील नव्हते. लग्नानंतर त्यांचे प्रेम अधिक बहरत गेले.  

संबंधित बातम्या