Vastu Tips: 'या' दिशेला झोपणे मानले जाते अशुभ

Vastu Tips for Sleeping: झोपताना कोणत्या वास्तु नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे हे जाणुन घेउया.
Vastu Tips for Sleeping
Vastu Tips for SleepingDainik Gomantak

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींसाठी नियम सांगितले आहेत. तसेच झोपताना कोणत्या वास्तु नियमांचे पालन करायचे हे देखिल सांगितले आहे. या वास्तु नियमांची काळजी घेतल्यास व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळू शकते. तसेच घरात समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार, झोपतानाही दिशांची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जाणून घ्या झोपताना कोणते वास्तु नियम पाळले पाहिजेत. वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Tips) घरातील प्रत्येक वस्तूसाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. यासोबतच माणसाच्या दैनंदिन दिनचर्येबाबत वास्तुशास्त्रात (Vastu Shtra) अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. कोणत्या दिशेला बसणे किंवा खाणे शुभ आहे हे वास्तूमध्ये सांगितले आहे

झोपताना या वास्तु नियमांची पालन करावे

* झोपताना पाय या दिशेला करू नका

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही अशा प्रकारे झोपू नये की त्याचे पाय उत्तर किंवा दक्षिण दिशेला असतील. कारण भगवान लक्ष्मी आणि कुबेर उत्तरेला तर पूर्वज दक्षिणेत वास करतात. यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्येबरोबरच विविध आजारांना सामोरे जावे लागतात.

* या दिशेने डोके ठेवून झोपा

दक्षिण आणि उत्तर

वास्तुशास्त्रानुसार उत्तर किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे शुभ मानले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते. यासोबतच वयातही वाढ होते.

Vastu Tips for Sleeping
Vastu Tips For Marriage: लगीन घाई झाली असेल तर घ्या 'या' गोष्टींची विशेष काळजी

पूर्वे दिशा

पूर्वेकडे डोके ठेवून झोपणे देखील चांगले मानले जाते. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने एकाग्रता वाढते. यासोबतच स्मरणशक्तीही (Memory) मजबुत होते.

पश्चिम दिशा

पश्चिमेकडे डोके ठेवून झोपणे देखील शुभ मानले जाते. कारण या दिशेचा स्वामी वरुण देव आहे. अशा स्थितीत या दिशेला डोके ठेवून झोपल्याने आदर वाढतो.

बेडची दिशा

वास्तुशास्त्रानुसार बेड कधीही दारासमोर नसावा. यामुळे तणावाखाली राहण्यासोबतच व्यक्तीला अनेक प्रकारची वाईट स्वप्ने पडतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com