Vastu Tips For Savings: कमी इनकममध्ये होईल मोठी सेविंग, आजपासूनच लावा 'या' सवयी

वास्तुशास्त्रात म्हटले जाते की या नियमांचे पालन केल्याने घरावर माता लक्ष्नाची कृपा राहते.
Vastu Tips For Savings
Vastu Tips For SavingsDainik Gomantak

Vastu Tips For Savings: आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या नियमांचे पालन केल्याने आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते.

तसेच जे काही कमावले त्यात समाधान मिळते आणि संपत्तीची वाढ होते. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही.

  • 'या' वस्तूंनी घर स्वच्छ करा

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) नेहमी घर स्वच्छ ठेवावे. पाण्यात मीठ घालून पुसल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरातील आर्थिक अडचणी दुर होतात. तुम्हाला जर 2023 मध्ये चांगली बचत करायची असेल तर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी घरातील मिठाच्या पाण्याने पुसू शकता.

  • 'हे' काम झोपण्यापूर्वी करा

वास्तुशास्त्रानुसार नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ पाण्याने धुवावे. ते कोरडे केल्यानंतरच झोपायला जावे. ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. दररोज असे केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता दूर होतात.

जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या आत सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो, ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होते.

  • या वस्तूंनी होम आरती करा

वास्तुशास्त्रानुसार 2023 मध्ये सकाळ-संध्याकाळ पूजा करताना, आरती करताना कापूर जाळावा. असे मानले जाते की कापूरचा वास वातावरणात वेगाने पसरतो आणि सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आकर्षित करतो. ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा होतो. असे केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्येही प्रगतीची शक्यता निर्माण होते.

  • याचे रोज पठण करावे

वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे रोज पठण करावे. पैशाची बचत करण्यासाठी खुप फायदेशीर आहे. 2023 मध्ये, तुम्ही दररोज लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण केले पाहिजे, ज्यामुळे तुमची प्रगती होईल आणि पैशाची बचत देखील होईल.

  • 2023 मध्ये ही सवय टाळा

वास्तुशास्त्रानुसार अनेकांना जेवण करतांना अभ्यास किंवा काम करण्याची सवय असते. ही सवय अशुभ मानली जाते. 2023 मध्ये ही सवय टाळा, ती तुमच्या पैशांसोबतच अनेक गोष्टींसाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते, तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केले तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवरही परिणाम होतो, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com