Vastu Tips: घरासमोर सांडपाणी असल्यास माता लक्ष्मी होईल नाराज

वास्तूनुसार घरामध्ये वस्तू योग्य दिशेने ठेवणे महत्त्वाचे आहे.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रात घराबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, पण दुसरीकडे वास्तूमध्ये काही त्रुटी राहिल्यास घरामध्ये त्रास, अडथळे आणि रोग सतत असतात.

वास्तूनुसार प्रत्येक दिशेवर कोणत्या ना कोणत्या देवतेचे स्थान आहे. याच कारणामुळे घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व आहे. चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. वास्तूनुसार घरामध्ये वस्तू योग्य दिशेने ठेवणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या वस्तु घराबाहेर ठेऊ नये हे जाणून घेउया.

  • घरासमोर सांडपाणी असणे

ज्या लोकांच्या घराबाहेर सांडपाणी आहे, त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. घरासमोर घाण पाणी साचले की नकारात्मकता येते. यामुळे घराबाहेर घाण पाणी साचू देऊ नका.

  • घरात काटेरी वनस्पती असणे

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर काटेरी झाडे लावू नका. वास्तूमध्ये हे अशूभ मानले जाते. ज्या घरांसमोर काटेरी झाडे असतात, त्या घरांमध्ये (Home) सुख-समृद्धी येण्यात अडथळे येतात.

  • घरासमोर कचरा ठेवणे

ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि वस्तू योग्य दिशेने ठेवल्या जातात, तेथे माता लक्ष्मीचा वास असतो. अनेकजण घरासमोर कचरा टाकतात. घराच्या दारासमोर कचरा हे गरिबीचे निदर्शक आहे. अशा स्थितीत ज्या घरांसमोर कचरा साचला जातो, त्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. या सवयीमुळे घरात अशांतता, रोग आणि धनहानी होण्याची शक्यता असते.

Vastu Tips
Ravivaar Upay: रविवारी सूर्यदेवाची उपासना केल्याने होईल सर्व संकटांपासून मुक्ती
  • घरापेक्षा रस्ता उंच असणे

वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी समोरच्या रस्त्यापेक्षा उंच असावा. ज्या लोकांचे घर समोर बांधलेल्या रस्त्याच्या खाली असेल तर तेथे नकारात्मक ऊर्जा वास करते. अशा घरांमध्ये नेहमीच रोगराई आणि भांडणे असतात.

  • घरासमोर विजेचा खांब असणे

वास्तूनुसार (Vastu Tips) घरासमोर विजेचा खांब नसावा. घरासमोर विजेचा खांब असल्यास घरातील सदस्यांमध्ये नेहमी भांडणे व वाद होतात.

  • घरासमोर दगड-विटांचा ढीग असणे

अनेक लोक आपले घर सुंदर बनवण्यासाठी घराबाहेर विविध प्रकारचे दगड आणि विटा ठेवतात. वास्तूनुसार घराबाहेर पडलेले दगड जीवनात यशाच्या मार्गात अडथळे आणतात. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर गोळा केलेले दगडही ठेवले असतील तर ते लगेच काढून टाकावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com