Fengshui Vastu Tips: देवघरात 'या' 3 गोष्टींची काळजी घ्यावी

Poojaroom Vastu: देवघर योग्य दिशेने असणे अत्यंत आवश्यक आहे.
Fengshui Vastu Tips: देवघरात 'या' 3 गोष्टींची काळजी घ्यावी
Fengshui Vastu TipsDainik Gomantak

मंदिरातील घर, दुकान, कारखाना, कार्यालयमध्ये प्रमुख स्थान हे देवघराला असते. आपण देवाचे स्मरण केव्हाही केव्हाही केले तरी लाभदायकच असते, पण घरातील प्रत्येक दिशेचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक कोपऱ्याचे स्वतःचे वेगळेपण असते. ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. पूजा घर एक अशी जागा आहे जिथे आपण पूजा करतो, शुभ कार्य करतो, सकारात्मक ऊर्जा आणतो आणि त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे देवघर योग्य दिशेने असणे गरजेचे आहे. (Poojaroom Vastu News)

* देवघर योग्य दिशेने

घरामध्ये देवघर बांधताना किंवा मंदिर ठेवताना सर्वप्रथम लक्षात ठेवावे की देवघर योग्य दिशेने असावे. मंदिर नेहमी ईशानमध्ये म्हणजेच ईशान्य कोनात किंवा पूर्वेला असावे. हे ठिकाण शुभ मानले जाते. देवघर कधीही दक्षिण-पश्चिम दिशेला नसावे. त्यामुळे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात.

Fengshui Vastu Tips
पुरुषांपेक्षा महिलांना थंडी जास्त का लागते? जाणून घ्या कारण

* पूजा करताना याग्य दिशेला बसावे

पूजा करताना तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करत आहात याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. मंदिरात लाल रंगाचे बल्ब अजिबात लावू नका. यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतो. पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते.

* कुठे असु नये

देवघर बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात, पायऱ्यांखाली, तळघरात अजिबात ठेवू नका. मंदिर हे शौचालयासमोर, वर किंवा खाली बांधू नये. असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो.

  • देवघरात तुटलेली मूर्ती ठेवू नये. तुटलेली मूर्ती असेल तर ती लवकर वाहावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा टिकुन राहील.

  • देवघरात शिळी फुले ठेवू नका. शिळी फुले जास्त दिवस पडून राहिल्यास फेकून द्यावीत. देवघरात पूर्वजांचे फोटोही ठेवू नका.

  • देवघरात पिवळ्या रंगाचे कापड पसरावे. लाल रंगाचे कपडे अजिबात घालू नका. तुम्ही एकतर पूर्वेकडे तोंड करावे. पूजेचे ठिकाण बनवताना पावित्र्य आणि शुद्धतेची काळजी घेतली पाहिजे.

  • कधी-कधी आपण एकाच देवाची अनेक चित्रे लावतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. घरात दोनपेक्षा जास्त शिवलिंग नसावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com