Shravan: घरात महादेवाची मूर्ती ठेवतांना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Vastu Tips For Home: घरामध्ये महादेवाची मूर्ती किंवा फोटो कोणत्या दिशेला लावावे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
Shravan 2022| lord shiva |
Shravan 2022| lord shiva |Dainik Gomantak

वास्तुशास्त्रातील उपाय जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी खूप उपयुक्त मानले जातात. वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरात देवाचे फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. घरात देवी-देवतांच्या मूर्ती ठेवल्याने सुख-समृद्धी लाभते. हिंदू धर्मामध्ये श्रावणात महादेवाला सर्वोच्च मानले जाते.

महादेवाच्या कृपेने मोठे संकटही टळू शकते. यामुळे घरामध्ये शिवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. जाणून घेऊया घरात शंकराची मूर्ती बसवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

घरामध्ये महादेवाचा फोटो जरूर लावावा. परंतु घरामध्ये महादेवाचा फोटो कोणत्या दिशेला लावावे हे देखील महत्त्वाचे आहे. महादेवाची आवडती दिशा उत्तर आहे. याच दिशेला त्यांचे निवासस्थान कैलास पर्वत आहे. त्यामुळे घरामध्ये महादेवाचा फोटो लावण्यासाठी उत्तर दिशेची निवड करावी. या दिशेला फोटो लावल्याने शुभ फळ मिळते.

Shravan 2022| lord shiva |
Shravan 2022: श्रावणात शिवलिंगासमोर दिवा लावणे मानले जाते शुभ

महादेवाचा असा फोटो उत्तर दिशेला ठेवा, ज्यामध्ये ते शांत आणि ध्यानस्थ आहेत किंवा नंदीवर बसलेले आहेत. याशिवाय फोटो अशा ठिकाणी ठेवावे, जिथून प्रत्येकजण त्यांना पाहू शकेल. याशिवाय, तुम्ही शिवाजीचे असे फोटो देखील लावू शकता ज्यामध्ये ते संपूर्ण कुटुंबासह बसलेले आहेत .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com