Vastu Tips: स्वयंपाक घरातील या वस्तु कधीच संपू देवू नका
Vastu tips: स्वयंपाक घरातील या वस्तु कधीच संपू देवू नका Dainik Gomantak

Vastu Tips: स्वयंपाक घरातील या वस्तु कधीच संपू देवू नका

स्वयंपाक घरातील काही वस्तु संपल्याने घरात नकारात्मकता वाढते,

आपल्या सर्वांच्या घरात स्वयंपाकघर हे सर्वात महत्वाचे ठिकाण मानले जाते. ही अशी जागा आहे जिथून घरात सुख- समृद्धी नांदते. असं म्हंटल जात की स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या कधीच संपू देवू नयेत. असे मानले जाते की या वस्तु संपल्याने घरात नकारात्मकता वाढते, घरातील समृद्धी दूर होते आणि गरीबी पसरू लागते. वास्तुशास्त्रात अशा पाच वस्तु सांगितल्या आहेत ज्या कढी संपू देवू नयेत.चला तर मग जाणून घेवूया या वस्तु कोणत्या आहेत.

* गव्हाचे पीठ

काही घरणमद्धे असे दिसून येते की जेव्हा पिठाचा डब्बा पूर्ण संपतो तेव्हाच नवीन पीठ आणले जाते. पण असे करू नका कारण यामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते. पिठाच्या डब्यातील पीठ संपत अळे की नवीन पीठ आणावे. यामुळे देवी लक्ष्मीची कृपया घरावर राहते.

* हळद

हळद हा स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक आहे. वास्तुशास्त्रात हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी असळल्याचे मानले जाते. जर तुमच्या स्वयंपाक घरातील हळद संपली तर गुरु दोषासारखी असते. गुरु दोषामुळे पैशाची कमतरताभासू शकते. यामुळे स्वयंपाक घरातील हळद कधीच संपू देवू नका.

* तांदूळ

तादुळाचा संबंध हा शुक्राशी आहे. घरातील तांदळाचा शेवट हा शुक्राचा दोष दर्शवतो. शुक्र दोषामुळे पती-पत्नीच्या नात्यातील कटुता येते. त्यामुळे घरातील तांदूळ कधीच संपू देवू नका.

* मीठ

स्वयंपाकघरात मीठ नसेल तर कसे होणार. मीठाशिवाय पदार्थाला तर चवच येत नाही. वास्तुशास्त्रात मिठ हा राहुचा द्रव्य मनाला जातो. स्वयंपाकघरातील मीठ संपल्यास राहूची वाईट नजर तुमच्यावर पडते आणि मग तुमचे काम बिघडू शकते. यामुळे घरातील मिठ कधीच पूर्ण संपू देवू नका. तसेच मीठ कधीच दुसऱ्यांच्या घरी मागू नये.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com