Vastu Tips For Plant: अनेक फायदे देणारं ‘हे’ रोप घरात असायलाच हवे!

Vastu Tips For Plant: घरात रोपे लावल्याने वातावरण शुद्ध होतेच, पण अनेक वास्तुदोषही दूर होतात.
Vastu Tips For Plant: अनेक फायदे देणारं ‘हे’ रोप घरात असायलाच हवे!
Vastu Tips For PlantsDainik Gomantak

घरामध्ये छोटी छोटी रोपं लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते. रोपे लावल्याने वातावरण शुद्ध होतेच, पण अनेक वास्तुदोषही दूर होतात. वास्तुशास्त्रात अशा अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे, ज्या आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासोबतच सुख-समृद्धी देखील प्रदान करतात. यातील काही रोपं आपल्याला निरोगी तर ठेवतातच, शिवाय घराची शोभा देखील वाढवतात. चला तर जाणून घेऊया अशाच एका रोपाबद्दल अधिक माहिती.

‘स्नेक’ वनस्पती फायदे

घरात ‘स्नेक प्लांट’ लावल्याने हवा शुद्ध राहते. यासोबतच या रोपामुळे तणाव कमी होऊन, मानसिक शांती मिळवण्यातही मदत होते. ही वनस्पती जीवनातील अनेक अडथळ्यांपासून आपले रक्षण करते, असे मानले जाते.

‘स्नेक प्लांट’ घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात, पूर्व किंवा दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते.

स्नेक प्लांट बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. हे रोप लिव्हिंग रूममध्ये ठेवणार असाल, तर अशा ठिकाणी ठेवा जिथे ते घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेस पडेल.

जर, तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी टेबलवर हे रोप ठेवा. त्यामुळे कार्यक्षमतेला गती मिळते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.

Vastu Tips For Plants
Goa Monsoon Trip: गोव्याला पावसाळ्यात जायचा विचार करत असाल, तर 'या' रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या

अशोक

घराबाहेर अशोकाचे झाड लावल्याने शोक दूर होते, असे म्हटले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढतो. तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जेचा निर्मीण होते.

लेव्हेंडर

घरात लेव्हेंडरसारखे जांभळ्या रंगाचे रोप लावणे शुभ मानले जाते. ही वनस्पती दिसायला जितकी सुंदर आहे, तितकेच त्याचे अनेक गुणधर्मही आहेत. या रोपामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि त्याचा सुगंध मनाला शांती देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com