Vastu Tips: गणपती बाप्पांची मनोभावे करा पूजा आणि घरावरील संकटे करा दूर

असे मानले जाते की ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान आहेत तिथे सुख शांती टिकून राहते.
Vastu Tips: गणपती बाप्पांची मनोभावे करा  पूजा आणि घरावरील संकटे करा दूर
Vastu Tips: गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा आणि घरावरील संकटे दूर करा Dainik Gomantak

घरातील संकटे दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. घरात सुख शांती लाभण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान आहेत तिथे सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रात गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास घरातील संकटे दूर होतात.

Dainik Gomantak

* ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये दोष आहे,अशा लोकांनी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी. घरातील कोणताही सदस्य जर अस्वस्थ असेल तर शेणापासून गणपती बाप्पांची मूर्ती बनवावी आणि त्याची पूजा करावी. यामुळे घरात सुख शांती नांदते.

* जर घरात वास्तु दोष असेल तर सिंदूर आणि तूप मिक्स करून घरातील त्या भागात स्वतिक बनवावा. असे केल्यास घरातील वास्तु दोष दूर होतो.

* गणपती बाप्पांची पूजा करतांना लाकडाच्या पाटावर लाल किंवा पिवळे रंगाचे कपडे घालून करावी, कारण गणपती बाप्पांला लाल आणि पिवळा रंग प्रिय आहे.

Vastu Tips: गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा आणि घरावरील संकटे दूर करा
Vastu Tips: घरात तुळस लावताय? या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होतील वाईट परिणाम

* गणपती बाप्पांची पूजा करतांना पूर्व किंवा उत्तर दिशेने बसावे. गणपती बाप्पांची पूजा करतांना हळद, कुमकुमने तिलक लावावा. जास्वंदाचे फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. तसेच गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते कारण गणपती बाप्पांला दूर्वा प्रिय आहे.

* गणपती बाप्पांला मोदक आणि लाडू प्रिय आहेत. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांला मोदक किंवा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करावे. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन घरावरील संकट दूर करतात.

* गणपती बाप्पाची मूर्ती घरावरील संकट दूर करण्यासाठी प्रभावी मानली जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच घरात सुख-शांती लाभते. असे मानले जाते की गणपती बाप्पा ज्या घरात विराजमान असतात त्या घरातील सदस्याचे आरोग्य निरोगी राहते.

* गणपती बाप्पांची मूर्ती घराच्या मुख्या प्रवेश द्वारावर ठेवणे शुभ मानले जाते. स्फटिकपासून तयार केलेली मूर्ती वास्तु दोष दूर करण्यासाठी प्रभावी मनाली जाते. तसेच हळदीपासून तयार केलेली गणपती बाप्पांची मूर्ती खूप शुभ मानली जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com