रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा

अतिशय सावकाश आणि कलात्मकरित्या वेदांतने गणपती बाप्पांला हा साज चढविला.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
रत्नखचित फरा तुज गौरी कुमराDainik Gomantak

वेदांत परबचे वय केवळ 18 आहे, मात्र त्याने चित्रकलेचा किंवा इतर कुठल्याही कलेचा फार अभ्यास न करताही आपल्या घरच्या गणपतीला कृत्रिम जडजवाहिरानी ज्या तऱ्हेने सजवले आहे ती फार कौतुक करण्यासारखी बाब आहे. कारापूर, साखळी येथील देविदास परब यांच्या गणपतीच्या कारखान्यात आपला गणपती रंगवून झाल्यानंतर वेदांतने त्या मूर्तीला स्वतः सजवायला सुरुवात केली. साखळीच्या बाजारात जाऊन त्याने स्वतः त्यासाठी आवश्यक असलेले सामान निवडले होते.

Dainik Gomantak

गणपती बाप्पांला कशाप्रकारे सजवायचे याचा विचार त्याने आधी केला नव्हता मात्र गणपती समोर बसून तत्कालस्फूर्ततेने तो गणपतीला सजवायचे काम करत राहिला. अर्थात गणपतीला देण्यात येणारा रंग मात्र आग्रहाने त्याने स्वतःला हवा तसा निवडला होता. या चित्रशाळेत त्याने गणपतीच्या दोन मूर्तीना सजवले. एक स्वतःच्या घरची आणि दुसरी त्याच्या मित्राच्या घरची. गणपतीला सजवताना विशेष काळजी घेऊन त्याने ते काम केले. अतिशय सावकाश पण कलात्मकतेने त्याने गणपती बाप्पांला हा साज चढविला.

रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा
गणपती बाप्पांच्या 4 भुजांचे जाणून घ्या महत्व

हे काम करायला, जरी तो पूर्ण दिवस त्यात व्यग्र नसायचा तरी, त्याला तीन दिवस लागले. वेदांतला ‘क्राफ्ट’ ची फार ओळख नसली तरी त्याने आपल्या कल्पनेतून त्या आधी लग्नाची पालखी तसेच हळद समारंभासाठी सजावट केलेली आहे. मात्र हे तो सारे दुसऱ्यांची कामे अवलोकन करून शिकला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com