Healthy Tips: हिवाळ्यात 'Vitamin D' साठी ऊन गरजेचं पण कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

सूर्यप्रकाशामध्ये व्यायाम केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
Healthy Tips
Healthy TipsDainik Gomantak

आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या शरीराला व्हिटॅमिन डिसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करणे खूप महत्वाचे आहे. हाडे आणि सांधे यांना भरपूर व्हिटॅमिन डी आवश्यकता असते. पण व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश मिळविण्याचा योग्य मार्ग आणि वेळ कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

  • ऊन्हात केव्हा आणि कधी बसावे...

सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर पडू देऊ नका. तज्ञांच्या मते सर्वोत्तम वेळ दुपारी 12:00 ते 3:00 दरम्यान आहे. तर दुसरीकडे, इतर डॉक्टरांचे म्हणणे आहे की सूर्यप्रकाश घेण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा सूर्याची किरणे खूप कठोर नसतात. कारण जर तुम्ही खूप प्रखर ऊन्हात बसलात तर सूर्याच्या किरणांच्या थेट संपर्कामुळे त्वचेचा मिलोनेमा होऊ शकतो, जो एक प्रकारचा घातक कर्करोग आहे.

न्युट्रिशन तज्ज्ञांच्या मते, सावळ्या रंगाच्या लोकांनी 30 मिनिटांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश घेऊ नये. तर गोरी त्वचा असलेल्या लोकांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. याशिवाय काही तज्ज्ञ असेही म्हणतात की, हलक्या रंगाचे कपडे (Cloths) घालून सूर्यप्रकाश घेणे चांगले. कारण ते सूर्यप्रकाश चांगल्या प्रमाणात शोषून घेतात.

उन्हात खेळणे हे मुलासाठी चांगली थेरपी असू शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नवजात बाळाला सूर्यप्रकाशात (SunRays) आणल्याने मेलाटोनिनच्या उत्पादनात खूप मदत होते, मेलाटोनिनची पातळी बाळाच्या झोपेची पद्धत नियंत्रित करते जी निरोगी राहण्यासाठी चांगली असते.

Healthy Tips
How to Deal with Loneliness : सतत एकटं वाटतंय? तर वेळीच व्हा सावधान! नाहीतर डिप्रेशनचे व्हाल शिकार

डिप्रेशनमध्ये (Depression) असलेल्या रुग्णासाठी सूर्यस्नान ही एक चांगली थेरपी देखील सिद्ध होऊ शकते. उन्हात राहिल्याने सेरोटोनिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि शांत राहू शकता.

साधारणपणे असे म्हटले जाते की व्हिटॅमिन डी (Vitamin D) चांगल्या प्रमाणात शरीराच्या 20% दररोज 15 मिनिटे सोषून घेउ शकते

हिवाळ्यात (Winter) हाडे निरोगी ठेवण्यासाठी उन्हात योग्य प्रमाणात व्यायाम केल्याने निरोगी राहते.

  • व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे काय होउ शकते

  • शरिरांचे हाडे कमजोर होउ शकतात

  • केस गळू शकतात

  • आपले मुड बदलू शकतात

  • वजन वाढू शकते.

  • श्वास घेण्यास समस्या येउ शकतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com