Travel Vomiting: प्रवासात उलटीचा त्रास होतो..तर मग हमखास सोबत ठेवा 'हे' पदार्थ

Travel Vomiting: हा मोशन सिकनेसमुळे होणारा त्रास आहे.
Travel Vomiting
Travel VomitingDainik Gomantak

Travel Vomiting: वेगवेगळ्या सुंदर पर्यटनस्थळांवर भटकंती करायला सगळ्यांना आवडते. रोजच्या कंटाळवाण्या रुटीनपासून थोडं लांब जात मस्त लॉंग ट्रीपला जावं, असं अनेकांना वाटतं. पण प्रवासात उलटीचा त्रास होत असल्यामुळे तसे प्लॅन तुम्हाला रद्द करावे लागतात का? होय, जर तुम्हाला पण प्रवासात उलटी, मळमळीचा त्रास होत असेल तर त्यावर काही रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे उपाय करुन तुम्हाला प्रवासात उलटी, मळमळीचा त्रास होणार नाही. तसेच तुम्ही लांब अंतराच्या ट्रीप मस्त एन्जॉय करु शकता. उलटी, मळमळ लांबच्या प्रवासामुळे होते, असे काही लोकांचा वाटते. पण हा त्रास कधीतरी प्रवास करणाऱ्या लोकांना होतो, तसाच प्रवासाची सवय असणाऱ्यांना पण होऊ शकतो. हा मोशन सिकनेसमुळे होणारा त्रास आहे.

Travel Vomiting
Travel VomitingDainik Gomantak
Travel Vomiting
Vitamin C Benefits : 'व्हिटामीन सी'चे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा सविस्तर

प्रवासाला निघताना 'हे' पदार्थ सोबत ठेवावेत-

  • पुदिना प्रवासाला निघताना तुम्ही पुदिना तेलीची बॉटलसोबत घेऊ शकता. तेलाचे 2-3 थेंब रुमालावर टाकून त्या रुमालाचा वास प्रवासात असताना घेऊ शकता.

  • आलं प्रवासात उलटी, मळमळीचा त्रास होत असेल तर तुम्ही आलं सोबत ठेवा. मोशन सिकनेसचा त्रास सुरु झाल्यावर छोटा आल्याचा तुकडा तोंडात टाका. लांबच्या प्रवासात (Traveling) हा उपाय केल्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

  • भरपुर पाणी प्या प्रवासा दरम्यान भरपूर पाणी प्या. त्यामुळे बॉडी हायड्रेटेड राहते. तसेच मोशन सिकनेसच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. डिहाईड्रेशनमुळे मोशन सिकनेसचा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.

  • लिंबू लांबच्या प्रवासात असताना लिंबूचा (Lemon) वास घेत रहा किंवा सरळ कापून चोखू शकता. हा उपाय तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला मळमळत असेल. लांबच्या प्रवासाला निघताना आवर्जुन हे पदार्थ सोबत ठेवावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com