वॉटर हीटर रॉड ठरतेय जीवघेणी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना इशारा दिला आहे; की अशी उपकरणे अत्यंत धोकादायक असल्याने ती टाळावीत.
वॉटर हीटर रॉड ठरतेय जीवघेणी
Water heater rod is fatalDainik Gomantak

वॉटर हीटर (Water heater) रॉड सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर कॉइल (Coil) सर्वात धोकादायक (fatal) ठरत आहेत कारण ही कॉइल पाण्यात (water) सोडली जाते आणि यामधून विद्युत प्रवाह पाण्यामध्ये जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने सांगायचा झाल तर वॉटर गिझर सर्वात सुरक्षित पर्याय आहेत, असे एका संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार "वॉटर हीटर रॉड लोकप्रिय ठरत आहेत कारण बाजारात त्या स्वस्त उपलब्ध आहेत तुलनेने गिझर महाग आहेत.

Water heater rod is fatal
मायक्रोवेव्हमध्ये या कंटेनरचा वापर टाळा

नुकत्याच घडलेल्या घटनेनुसार

देहू रोडवरील लक्ष्मीपुरम येथील निवासस्थानी एका कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना इशारा दिला आहे की अशी उपकरणे अत्यंत धोकादायक असल्याने ती टाळावीत. अठ्ठावीस वर्षीय मणिपार्डी सेल्वन यांचा शनिवारी विजेच्या धक्क्यामूळे मृत्यू झाला होता, दरम्यान तिने बादलीमधील पाणी पुरेसे गरम केले आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला असता कॉइल चा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

वॉटर हीटर रॉड हे एक मूलभूत वॉटर हीटिंग उपकरण आहे जे फक्त दोन मिनिटांत पाण्याची संपूर्ण बादली गरम करू शकते. त्यात एक हीटिंग कॉइल आणि इलेक्ट्रिक लोखंडी रॉड आहे. हे उपकरण वापरण्यासाठी

Water heater rod is fatal
तुम्हाला माहिती आहे का; कमी पाणी पिण्याचे तोटे?
Water heater rod is fatal
Water heater rod is fatalDainik Gomantak

खरेदी करताना हे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे: -

  • वॉटर हिटर रॉडमध्ये स्वयं-बंद वैशिष्ट्य नसते. याचा अर्थ जेव्हा पाण्याने भरलेला कंटेनर गरम झाला असेल, तेव्हा उपकरण स्वतःला बंद करावे लागते.

  • गिझरप्रमाणेच, वॉटर हीटरचा अमर्यादित वापर केल्याने तो शॉर्ट होण्याची शक्यता असते

  • उपकरण वापरताना कोणत्याही प्रकारचा अपघात टाळण्यासाठी ब्रँडेड उत्पादनाचा वापर करा; खराब दर्जाची उत्पादने धोकादायक ठरू शकतात.

वॉटर हीटर हाताळताना आपण कोणत्या सुरक्षा खबरदारी घेणे आवश्यक आहे?

  • घरातील मुलांना यापासून लांब ठेवा विशेषतः जेव्हा ते वापरात असताना खबरदारी घ्या.

  • पाण्यात टाकण्यापूर्वी कधीही स्विच लावू नका.

  • स्विच बंद करण्यापूर्वी नेहमी पाण्याला थेट स्पर्श करणे टाळा.

  • पाणी बंद केल्यावर त्याला स्पर्श करताना सावधगिरी बाळगा

  • या प्रकरणात नेहमी धातूच्या बादल्या टाळा कारण धातूच्या बादल्यांमुळे विजेचा शॉक बसण्याची शक्यता असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com