परफेक्ट मेकअप हवाय? तर करा पाण्याचा वापर

मेकअप (Makeup) जर परफेक्ट असेल तर फोटोही (Photo) चांगले येतात.
परफेक्ट मेकअप हवाय? तर करा पाण्याचा वापर
परफेक्ट मेकअप हवाय!तर करा पाण्याचा वापर Dainik Gomantak

लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. मुलींच्या तयारीचा विचार केला तर लग्नासाठी तयार होण्यासाठी मेकअप ही सर्वात महत्वाची आहे. आता मेकअप (Makeup) जर परफेक्ट असेल तर लुकही (Look) आकर्षित होतो आणि फोटोही (Photo) चांगले येतात. आता परफेक्ट मेकअपसाठी तुम्हाला फक्त एकाच गोष्टींचा अवलंब करावा लागेल आणि ती म्हणजे पाणी. पाण्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मेकअप (Makeup) परफेक्ट करू शकता.चला तर मग जाणून घेवूया पाण्याच्या मदतीने मेकअप कसा करावा.

* प्रत्येक मुलीला आपला मेकअप परफेक्ट आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी पाण्याचा वापर करावा. पाण्याच्या मदतीने तुम्ही केवळ मेकअपच सेट करू शकत नही तर परफेक्ट आणि दीर्घकाळ टिकणारा मेकअप करू शकता. यासाठी तुम्ही मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर पाणी स्प्रे करावे आणि नंतर टिश्यू पेपरने स्वच्छ करावे. काही काळ बर्फाच्या पाण्याने चेहरा धुवू शकता.

* डोळ्यांचा मेकअप परफेक्ट दिसण्यासाठी आयशॅडो लावताना तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. हे लुक आकर्षक आणि सुंदर दिसते. यासाठी ब्रश थोडे ओले करावे आणि नंतर आयकलर डोळ्यांना लावावा.

परफेक्ट मेकअप हवाय!तर करा पाण्याचा वापर
Winter care Tips: हिवाळ्यात ओठांची घ्या अशी काळजी

* जर तुम्हाला तुमचा मेकअप परफेक्ट आणि आकर्षक करायचा असेल तर तुम्ही तुमचे ब्युटी ब्लेंडर पाण्यात भिजवून मग बोटानी बेस लावू शकता किंवा नंतर ब्लेंडरने डब करतांना मेकअप बेस पसरवा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com