ऑफिसच्या कामाचा खूप स्ट्रेस येतोय? मग या गोष्टी लक्षात ठेवाच

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

ऑफिसमध्ये असलेल्या कामाचा दीर्घकाळ दबाव आणि वातावरणामुळे आपण शारिरीक न मानसिक संतुलन राखू शकत नाही व यामुळे ताणतणाव येऊन शारिरीक व मानसिक तक्ररींना सुरूवात होते. परंतु, या मार्गांचा अवलंब करून आपण आपला ताण कमी करू शकता. 

नोकरदारांना त्यांचा जीवनाचा एक मोठा भाग त्यांच्या कार्यालयातच घालवावा लागतो. अशा परिस्थितीत तेथील वातावरणाचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. बर्‍याच वेळा, ऑफिसमध्ये असलेल्या कामाचा दीर्घकाळ दबाव आणि वातावरणामुळे आपण शारिरीक न मानसिक संतुलन राखू शकत नाही व यामुळे ताणतणाव येऊन शारिरीक व मानसिक तक्ररींना सुरूवात होते. परंतु, या मार्गांचा अवलंब करून आपण आपला ताण कमी करू शकता. 

टाइम मॅनेजमेंट हे सर्वात महत्त्वाचे

ऑफिसचे टेन्शन आहे, वेळेवर पोहोचणे, काम वेळेवर करणे अशाप्रकारे वेळेनुसार काम केल्याने तुम्हाला ऑफिसच्या टेन्शनपासून नेहमीच दूर राहता येईल. म्हणून कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आजची कामे उद्यावर ढकलू नका. 

विश्रांती घेणे आवश्यक आहे

कार्यालयातील कामाच्या दरम्यान ब्रेक घेत रहावे. सतत बसून राहणे ताण वाढण्याचे एक मोठे कारण असू शकते. आपण काम दरम्यान थोडा ब्रेक घेणे आणि चहा किंवा कॉफी घेत रहाणे चांगले आहे. 

लंच कॅन्टीनमध्येच करा

आपल्या डेस्कवर जेवण्यापेक्षा कॅन्टीनमध्ये जाऊनच जेवा. डेस्कवर बसून जेवल्यास तुमचे निम्मे लक्ष हे अपूर्ण कामवर राहील. यापेक्षा कॅन्टीनमध्ये आरामात जेवण्याचा प्रयत्न करा. ही पद्धत तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरेल.

अधून-मधून फिरायला जा 

आपल्या दैनंदिन काम ते घर, पुन्हा काम या रुटीनमुळे आपण थकून जातो. आपलं मन व शरीर रिफ्रेश करण्यासाठी फिरायला जाणे गरजेचे आहे. वर्षातले काही दिवस तरी ब्रेक घेऊन,  कुटुंबासोबत आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा.याने  नक्कीच तुमच्या मनावरचा ताण कमी होईल.अशा परिस्थितीत वर्षातून एकदा किंवा आठवड्याच्या शेवटी कुठेतरी बाहेर जा. आपल्याला ऑफिसच्या कामापासून आणि ताणपासून दूर ठेवण्यासाठी ही पद्धत एक चांगला पर्याय असू शकते.

संबंधित बातम्या